पान:देवमामलेदार.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ देवमामलेदार. महा०-( चिंतोपंतास ) आपला आग्रह फार दिसतो, बरें आहे; त्या नरहरीची मर्जी.. चला, त्यांनीच आपल्याला वासना दिली ही. (चितोपत सर्वजातात,) तिसरा प्रवेश समाप्त. प्रवेश ४ था. (स्थळ-मुंबई, शिंदे सरकारचा बंगला, पात्रं-जयाजीराव शिंदे, व राणी बोलत आहेत.) जयाजीराव-( गळ्यांत हात घालून ) प्रिये, आज मला धन्य झाल्या सारखे वाटत आहे ! महाराजांचे चरण, मनोदया प्रमाणे आपल्या या ठिकाणास लागले; त्यांची यथा सांग पूजा करायला सांपडली. जी जी माझ्या हातून महाराजांची सेवा घडावी अशी माझी इच्छा होती, ती ती, सिद्धिला गेली. त्यांच्या तरतुदीत काही कमी पडू नये, अशी चार दिवस मी तजविज ठेवली होती, तिही शेवटी सिद्धिला गेली; याने माझ्या मनाला किती आनंद होत आहे म्हणून सांग ! आता आजचा हा शेवटचा दिवस ह्या महासाधुच्या दर्शन सुखाचा. “साधु संत येती घरा ॥ तोची दिवाळी दसरा ॥" हे अगदी खरे आहे. चल, तुला आता महाराजाचे बसायाचे स्थल, किती श्रृंगारले आहे, ते अगोदर दाखवतो ! मग तू राणीवशात जाऊन बैस. अजून महाराजाना एक तासाचा अवकाश आहे यायला म्हणून आत्तांच हरकाम्या सांगून गेला. राणी-(हंसत ) मलाहि आपल्या आनंदाची देवानें अघी वाटेकारण केली आहे बरं का ! एकटंच धन्य होऊ नये काही! मा नाही का आपल्या बरोबर झाले ? जया-(हसत) वः तूं अगोदर, महाशक्ति आदि माया तू. तुझ्या मुळेच तर या सर्व गोष्टि घडन येत आहेत. ज्यांत तूं नाहास ते मला रुक्ष भासतें. तुझ्या शिवाय, आम्हां फटिंगाना साधु सत तरि कुठे विचारणार आहेत ? राणी-खोटे नाही काहीं! सितेशिवाय राम, अगस्ती मुनाम दर्शना करितां गेले, तर दिले कां दर्शन अगस्तिमुनीने .