पान:देवमामलेदार.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २रा. महाराजांस पुन्हां फर्सक्लास मध्ये बसवतात 'यशवंतराव महाराजकी जय' असागजर होतो, घंटा होते, गाडी चालू लागते. षडदा पडतो.) प्रवेश दुसरा समाप्त । प्रवेश ३ रा. (स्थल-बोरीबंदर स्टेशन. लोक ' यशवंतराव महाराजकी जय' असा गजर करतात. ' गर्दी मत करो' वगैरे पोलिस बोलून बंदोबस्त करतात. चितोपंत या नावाचे गृहस्थ भाविकपणे पाया पडतात व फुले उधळतात. महाराजांच्या गळ्यात माळा घालतात. पेढे बरफी नारळ वगरे वर्षाव होतो. व 'प्रसाद वाटन टाका' वगैरे शब्द महाराज उच्चारतात. 'गरीबाला दरे माय बाप' असे गरिब बोलतात, त्यास महाराज देतात.) एक-(पाया पडून मुलगा पुढे करून ) महाराज गरिबि फार. मुलगा हा मुंजीचा. मुंबईची वस्ती. ब्राह्मण आहे. नांव ऐकून पाया. पाशी आलो आहे. महा०-( हातांतली आंगठी देतात, व दुसेर मागतात त्यास देतात, जो तो “ईश्वर तुम्हांला यश देईल " असे म्हणतो,) चितोपंत-( महाराजांचा हात धरून, लोकांस ) बाबानो, सकाळी महाराज आहेतच येथें. आतां त्याना जरा फराळ वगैरे करून विश्रांती घेऊंद्या. त्याना त्रास नका देऊ. महा-कांही त्रास नाही बरं. कोणाला दुखवू नका. चला. (यशवंतराव महाराजकी जय असा गजर होतो.) चिंतो०-फराळाची सिद्धता आहे, तरि महाराजांनी या दासाची एवढी सेवा घ्यावी. नाही म्हणू नये, हा मी न्यायलाच आलो आहे महाराजाना. (बागवाल्यास )ए कोचमन, इकडे ये (कोचमन येतो.) कोचमन-जी, हुकूम चितो०-बोझे उठाव है. आणखि दोन चार बगिवाल्यांना णि गाडि वाल्यांना बोलाव हे दुसरे बोजे नेऊन टाकायचे आहेत डळींचे. ( कोचमन 'जी' म्हणून जातो.)