पान:देवमामलेदार.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. इथे जेव्हां, साहा वाजल्या पासून गर्दी व्हायला लागली, तेव्हां मात्र आमची खात्री होत चालली. ( दुसऱ्या तारवाल्यास ) काय हो अझून नाहीं वानिग टिटवाळ्याकडून ? दुतार०-(वार्निंग येतो) हा ऐका सुटली गाडी टिटवाळ्याहून ! प०तार-आतां कांहीं उशिर नाही. बारा मिनटांत गाडी ठेवलेली इथं. हे पहा, फळेवाले, मिठाईवाले, उठले आपल्या छाबड्या घेऊन! पोलिस-चलाव. पिछे हटो. एक जग्गेपर खडा रहो. (लोकांना हटवित मागें नेतात. घंटा होते, गाडि प्लाटफार्मवर येते, स्टेशन मास्तर वगैरे मंडळी पुढे जाऊन, महाराजांस त्यां करिता तयार केलेल्या आसनावर नेऊन बसवतात. “ यशवंतराव महाराजकी जय" असा गजर होतो. युरोपियन टोप्या काढून सलाम करतात. बर्फि पेढे नारळ वगैरेंचा वर्षाव होतो. महाराज ते सर्व प्रसाद वाटा" असे सांगतात.) एकजण-( महाराजांच्या पायापडून) महाराज, गरिब आहे मी. खायला अन्न नाही घरात. पदरी हे असें कुटुंब, मुलें बाळे, ( दाखवून ) दूध नाही मिळत यांना. असल्या बाळांना. (डोळे पुसतो.) महा०-(नोट देऊन ) पाजा बरें दुध मुलांना ! एक-देव तुमचे कल्याण करो ( पाया पडतो जातो.) दु०-(मुलीस पुढे करून ) महाराज, गरिव आहे, मुलगी ही उपवर झालेली, द्रव्या शिवाय लग्न कसे होणार? काही हात भार लावाल तर महा०-(नोट देतो.) काही काळजी करू नका बरें. आणखी लागलीच गरज तर भेटा पुन्हां. दु-अहाहा, काय दातृत्व हे. महाराज, देव आपल्याला कधी कमी पडू देणार नाही. ( मनांत ) किती भोळेपणा हा, या पैशाचा उपयोग, या मुलीच्या लग्नाकडेच लावणार ! (जातो.) (पुष्कळांस महाराज पैसे देतात. नंतर स्टेशन मास्तर वगर