पान:देवमामलेदार.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. प्रवेश २ रा. (स्थळ-कल्याण स्टेशन. प्लाटफार्म, दर्शनार्थ जमलेली मंडळी व युरोपियन आपल्या लेडिसह फिरत आहेत वगैरे देखावा.) एक-गावांत हं हं म्हणता बातमी पसरली. तारावर तारा चालल्या आहेत आज. कळायला किती उशीर? महाराज, या गाडिने येणार इतके कळलें मात्र, जो सो उत्सुकतेने लागला धावायला स्टेशनाकडे. ही पहाना किती गर्दी जमली आहे ती. रिघ नाही माणसाला ! काय कलकल चालवली आहे, बोलून सुद्धां देत नाही ही मंडळी. बायकांच्या कुठे गेल्या तरि गोष्टि संपायच्या नाहीत. इथे आतां दर्शन घ्यायला आल्या आहेत, तरि घरच्या गोष्टि चालूच आहेत. डोके उठले बुवा आपलें ! मलाहि याच गाडिने मुंबईला जायचे आहे. (घड्याळाकडे पाहून) अरे पण आज गाडि लेट आहे बरिच. दुसरा-गाडिचा आज ठिक ठिकाणी खोळंबा होत असेल प्रकळ ? (तारमास्तरकडे पाहून ) काय हो असेंचना ? याना माहित असलं पाहिजे. टेलिग्राफ सगळा यांच्या हातांत ! तारमास्तर-तरि हूकम सुटले आहेत वरून, किं फारवेळ गाडी डिटेन करूं नये स्टेशनवर. लोकांचे थवेच्या थवे जमतात दर स्टेशनावर. इंन्स्ट्रमेंट मधून इगतपुरीला विचारले, तर माणूस आतशय लोटले आहे, प्लाटफार्म सगळा माणसांनी फुलला आहे, पोलीसांनी प्रथम जेमतेम बंदोबस्त ठेवला होता, परंतु महाराज डब्यांतन खाली उतरतांच, एकदम "यशवंतराव महाराजकी जय" म्हणून जी मंडळींनी उसळी खाल्ली, तिच्या बरोबर, ज्यांनी आडवून धरलें होतें लोकांना, असे दोन तिन पोलिस, हापटले प्लाटफार्मावर. (हंसतात.) दुसरा-उद्धट लोक! बोरीबंदरवर आज जैय्यत बंदोबस्त ठेवावा लागेल, मुंबई आहे ती. तार-पण, प्रथम आम्हांला इगतपुरीवाल्याची वायर खोटीच. वाटली. निव्वळ थट्टा असावी, अशी आमची कल्पना होती. परंतु