पान:देवमामलेदार.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. हे तरि जाणे म्हणजे काय शिंदे सरकारला, ही ईश्वराने बुद्धि दिली. चमत्कार वाटतो बुवा! नारा०-चमत्कारा सारखीच गोष्ट आहे, शिंदे म्हणजे केवढे बडे प्रकर्ण तें! माध०-राजे लोकांच्या एकदां मनांत आले किं आलें. लहरीवर असतें या लोकांचें! नारा०-ही केवळ लहर म्हणू नका माधवराव. अशा पुरुषाचे, कोणाला दर्शन घ्यावेसे वाटणार नाही ? मग हे तर शिंद्याचे वंशज ! महापराक्रमी भक्तिमान घराणे. महादजी शिंदे, वगरे कसले भक्तिमान पराक्रमी पुरुष होऊन गेले. आणि हे महाराज काही कमी नाहीत. जयाजीराव शिंदे ! पाणीदार-कडक उपासना शिवाची. माध०-लहरी म्हणजे माझ्या बोलण्याचा तसा अर्थ समजू नका. अहो इतकी श्रद्धा राहिली आहे कुठे? पण महाराजांच्या मनांत येतांच, लागलीच मुंबई सरकारला कळवून पार. नारा०-मुंबई सरकारने बरा अडथळा केला नाही. लागलीच अर्जट तार कलेक्टरकडे नाशिकच्या. माध०-अंः अडथळा कां करिल ? महाराजांची योग्यता काय जाणत नसेल मुंबई सरकार? नारा०-'यशवंत' नांव अगदी योग्य आहे. ( इतक्यात काळू येतो.) काळ०-माधोराव दादा, गाड्या भरून समद्या दिल्याती लावन मोरं. त्येसनी सांगितलया की, मनमाडाचा रस्ता धरा. आपलं अच्यारी पानकंभि चालल्याती एक गाडी घेऊनशान्. माघ-जा जा, त्यांनी देव वगरे महाराजांचें सामान बरोबर घेतले आहे का विचारून ये. काळू-तेच सांगाया पाई आलुया जी. गोविंद भटानं सांगितलया देव बिव समदं मी घेऊनशान पुढे झालो, तुम्ही निघा समद्यांना घेऊन बिगीबिगी. महाराजबी निघालं. चिमण्या जपतोया गाडी. माध-चला तर.( सर्व जातात.) प्रवेश पहिला समाप्त.