पान:देवमामलेदार.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. ३७ बजावल हायना! त्य रामाच देऊल तरि व्हायलच. येकादा वाटसरु मिळायचा थत. पन कामाची गदी लयी आज, म्हून नाहीं झाला येळ असं सांगन माधुरावना. विगिबिगी भाकर खाऊनशान गाड्यामंदि सामान भरलं पायज अदुगर ! (पुन्हां पडद्यांतून काळु अशी हाक येते.) काळ०-जी. (पुढे जातो. पडदा उघडतो माधवराव व नारायणराव बोलत आहेत असे दिसते.) माधo-काल, राहिले नाहिंना आतां कोणतें हि ठिकाण ? बघ, नाही तर शिंच्या ठेवलें असशिल एकादें ? काळु०-आज लई कामाची गडबड दादा. त्ये रामाचं घेऊळ ग्येलंच राहून गडबडीत, तथ पन पघा, असतया अन नसतयाबी वाटसरु. आतां विगीबिगी भाकर खाऊनशान्, सामान भरलं पाहिज्ये गाडया मधून. माध०-तें काही नाही. अगोदर काळ्या अस्सा रामाच्या देवळांतून जाऊन ये. इकडे गाड्या भरायला, लावतो मी दुसया कोणाला तरि, जा, जा पळ. (काळ्या जातो.) अरे कासऱ्या, ए चिमण्या; (ते 'जी' म्हणून येतात त्यास ) अरे, तुमच्या भाकऱ्या खाऊन झाल्या असतील. तर गाड्या भरायला लागा. उठवा ते बोजे झराझर! चिमण्या-जी उठवतोया. (गाडीवानास मोठमोठ्याने कासन्य०- सादा घालित जातात.) नारायण-ही एक मोठी मौज उडून राहिली आहे बुवा या वेळेस ! पण या सगळ्या मौजेचा प्राण कोण, तर महाराज. माधव०-चला बहुतेक तयारी झाल्या सारखी आहे. सामान सुमान ज्याच्या शिवाय अडणारच, असें कांहीं राहिले नाही आता बांधायचे. गाड्या भरल्या किं, करा म्हणावें निघण्याची तयारी. नारा-आपल्याला तर ही अगदी, नव्यानेच मुंबई पाहायला सांपडणार. तुम्हाला माधवराव ? माध०-प्रसंग पडेल तर ना ? प्रसंगच नाही, मग जातो कोण ?