पान:देवमामलेदार.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. जवळ किंमत नाही, त्यानां सांगून काय उपयोग ? याचा हे विपरीत अर्थ मात्र करतील ! ट्रे०३०-(गहिवरून, महारांजाकडे पहात) मामलडार. टुमी टुमच्या मनाला वाईट वाटून डेऊ नका. आमी टुमचा अब्रू खलाश करावा म्हणून ये केला नाय ! टुमी आपले तोंडाशी कबूल आले होटे टो ये चमत्कार कशा झाला? चिटणीस-(बापूसाहेबास हळूच ) धडगत दिसत नाही आता आपली. हा साहेब पण त्यांच्या बरोबर रडायला लागला! सदा-(स्वगत) मलाबी दया येते महाराजांची. फार वाईट काम ये खोटा लिवना आपण तो नाय लिवनार. फौजदार०-साहेब, फार जंटलमन् आहेत हे. ह्यांना आमचे हिंदु देव मानतात. ह्यांचा सर्व भरंवसा देवावर आहे. देवानी रुपये तेथे भरून ठेऊन, आपली बज राखली; म्हणून ते देवाची प्रार्थना करित आहेत. टे० इ०-टो अशा जंटलमन्ची, आमीभी माफी मागून, त्यांच्या पाया पडटो. ( टोपी काढतो. पडदा पडतो.) अंक पहिला समाप्त । अंक २ रा. प्रवेश १ ला. (स्थळ, सटाणे, एक रस्ता. पात्रे-महाराजांचा गडी काळ व भडजी हातांत पळीपंचपात्री घेऊन एकाबाजूने येतात, व दुसऱ्या बाजूने एक ग्रामस्थ प्रवेश करतो.) ग्रामस्थ-( आपल्याशी) या भडजीला विचारावें, हा महाराजा कडलाच दिसतो. त्यांच्याच घराकडे चालला आहे. बरोबर गडी महाराजांच, आहे, शंका कशाला ? याच्या जवळ महाराज, शिंदे सरकारच्या भेटिला कधी जाणार, ही बातमी बरोबर लागेल.