पान:देवमामलेदार.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. चिट०-(साहेबास फौजदार महाराजांच्या बाजूला असल्या बद्दल खुणावतो.) ट्रे०३०-फौजदार, टुमची भी ये लूटमंडी भागी हाय अशा मला वाटतो। महा-शिव, शिव ! नृसिंहराया, मी लूट केली की सरकार• च्यांच गरीब अनाथ लेकरांचेंच रक्षण केले, हे तुला ठाऊक! देवा तुझ्या घरी न्याय आहे, तेव्हा या देशचा प्रजेचा कर या देशाच्याच प्रजेच्या रक्षणाच्या मुख्य हेतूकरतां आहे, आणि तो हेतु मी राखलेला असून, तो पैका परत स्वतःच्या पदरास खार लावन भर. ण्याला तयार असून, असा गहजब झालेला तुला आवडतो ना देवा! तुझी इच्छा ! हे कलीचें राज्य आहे; सोडव यांच्यातून लवकर, फौजदार-(स्वगत ) पैसे तिजोरीतून काढल्याची गोष्ट, महाराज स्वतःच कबूल कारत आहेत. तरि त्यांतला हेतू वाईट नाही(उघड) साहेब आम्हाला नेहमी असे अनुभव येतात, म्हणून म्हटले एकदां तिजोरी तपासन रुपये कमी असल्याचे आढळले, की कोणाचीहि कायदेशीर भीती राहिली नाहीं, बिडी ठोकायला. ट्रे०३०-ये टुमच्या केहेना बराबर हाय टो चलो, गिनो? (ति. जोरी उघडून रुपये मोजतात, ते बरोबर भरतात.) अरे ये क्या भूत चेष्टा हाये. भूल होगी, फेर गिनो. ( पुन्हां मोजतात, तरीबरोबर भरतात, साहेब ओशाळतो.) ट्रे०३०-( महाराजास ) ये कशा झ्याला ? टुमी रुपये काढला होटा, टो पुन्हां कशा येऊन बशला! टुमी आमाला फशवला, खोटा बोलन ? खरा बोला! महाराज-( आनंदाश्रुचे भरतें येऊन ) देवा, नृसिंहराया, तुला संकट पडले रे माझें ! तुझ्यावर भार घालून बसलों ! यःकश्चित कारणा करता तुला श्रम दिले ! त्या पेक्षा माझी विटंबना झाली असती तर त्यांत काय वाईट होतें! आतां हे मी यांना कस समजावून सांग? या अभाविकांना तुझी लीला काय समजणार ! भावरुप कल्पवृक्षाची यांच्या जवळ किंमत नाही ! आणि ज्यांच्या