पान:देवमामलेदार.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. ३३ ट्रे०३०-(महाराजास रागानें ) ए यू. अशा बोलटे टुमी ? टुमच्या डेवाने टुमाला टिजोरी लुटायला सांगितला ? कोणचा डेव टो बटाव ! महा-साहेब, देवाने सांगितले असे माझे शब्द नव्हते. मों इतकेंच म्हणालों की, श्रीनृसिंहाच्या मनात असले तर तसे होईल. म्हणजे या हातांना शृखंला बंधनाचे सोहाळे होतील. आणि त्या प्रभच्या मनांत नसेल तर आपणा मानवांच्या हातून काय होणार आहे? त्याची लीला अज्ञानास कळत नाही. म्हणून तो त्याची सत्ता सर्वत्र भरलेली आहे, हे जाणत नाही. आपली मानवांची राज्ये, देवाच्या राज्यांत मुंग्यांच्या राज्या सारखी आहेत ! म्हणून मानवांनीं गर्व न करता त्याला भिऊन वागावें ! ट्रे०३०-ज्यांनी टुमाला टिजोरी चोरायला सांगिटली, व्याला भिऊन वागावा ? ट्याचा बाप आला टोभी नाय आपण व्येची ढास्टि बाळगणार ! (बुट आपटतो) सिपाय बिडी मंगाव फौजदारक बुलाको जाव. (शिपायी जातो.) महा-नृसिंहराया, मी जे केले, तें तुला मान्य असले म्हणजे चिंता नाही. मग माझे कितीही हाल, अपेष्टा, विटंबना, होवोत ! अपमानाच्या कड्यावरून जरि माझा कडेलोट केला, तार सुद्धा मला तिळमात्र वाईट वाटायचे नाही. कारण तुझ्या भवतारक नामस्मरणाचा महिमा, मला माहित आहे. प्रभो, प्रहादा करतां अवतार घेऊन, त्याचे रक्षण केलेंस हे तुझें ब्रिद आहे ! तुझ्या ब्रिदावर विश्वास ठेऊन मी शांतपणे सर्व दुःखें भोगण्याला तयार आहे ! ट्रे०३०-( फौजदार येतो ) फौजडार इस्को बिडी ठोक. ये टिजोरी लुटणारा मामलटडार हाय. फौजदार-(स्वगत) काय मजवर प्रसंग आणलास हा परमश्वरा ! आतां या हातांनी या साधुवर्याना श्रृंखला बंधन व्हायचें काय ? ( उघड ) साहेब, बिडी ठोकतोच मी. असा गुन्हा होणे, हे चांगले नाही. पण आपण पुरी चौकशी केली आहेना? नाही तर मागन आपल्याच गळ्यांत यायचे ! कारण असल्या खोट्याबातम्या देणारे पुष्कळ लोक असतात !