पान:देवमामलेदार.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. दिवस तिजोरी तपासण्याचा नाही, मध्येच तिजोरी तपासण्यास येण्याचे कारण काय ते कळवण्याची मेहरबानी झाली पाहिजे." ट्रे०३०-(अर्ज पुढे करून ) ह्या आजोट काय लिखलेला हाय टो बघा, टेव्हां टुमाला शमजेल, आमी मडे टपासाला का आले ! महा-(अर्ज घेऊन मनांत वाचतात.) बापु०-( हळू चिडणीसास ) चेहरा फिरला राजश्रींचा. कर्म केलेले झाकतें काय ? (हंसतो.) चिट०-(हसत ) बातमी मुळीच खोटी नाही ही. पक्का तपास आहे मला. पण त्या मानाने चेहरा घाबरलेला मुळीच दिसत नाही. ट्रे०३०-बोलो जल्दी, सन. मामलटडार, ये काम चांगला नाय टुमी पिपल आयसे लोक, टिजोरीची अफरा टफर करटे ये. महा०-साहेब, कांहीं विघ्नसंतोषी लोक, माझ्या वाईटावर आहेत ! हे मी आपल्याला एवढ्या साठीच सांगतो की, आपण त्यांच्या लिहीण्यावरून माझ्या अब्रस कमीपणा आणण्यास तयार होऊ नये. मी सरकारची नोकरी किती नेकीने बजावित आहे, हे साहेबांना सुद्धा माहित आहे. परंतु त्याचा उच्चार आज या कारणामुळे, मला माझ्या मुखाने करावा लागत आहे. श्रीनृसिंहाला साक्षी ठेऊन मी या दयाळ सरकारच्या तिजोरीतून, सरकारच्याच गरिब प्रजेच्या रक्षणासाठी पांचशे रुपये काढले आहेत. आणि ते मी मुदतीत ठेवण्याचा पूर्ण निश्चय केला आहे. ट्रेइ०-( रागाने पहात ) ए यू, सरकारची टिजोरी लुटणारा मामलटदार, टुला बिडी ठोकली पाहिजे. (चिटणीस, बापूसाहेब, व मारवाडी आनंदाने एकमेकांस खणावतात.) महा-श्रीनृसिंहाच्या मनात असेल तर होईल तसें ! ट्रे०३०-(चिटणिसास ) शिरनिर शिरनिर क्या बोलटे ये ? चिट०-साहेब ते आमच्या हिंदूंच्या देवाचें नांव आहे. बापु०-देवाने आपल्याला तिजोरी लटायला सांगितले, असें बोलताहेत ते साहेब