पान:देवमामलेदार.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिट अंक १ ला. सदा०-हाच, हाच आमचा मणणा. ह्येच्यावर कोण काय बोलतो तेच आमाला बघायचा आहे. बापु०-आणि दुसरी गोष्ट अशी की, जर खरें सोने आहे, तर त्याने तांवाला कां भ्यावे ? बरोबर बरोबर. (वकिल जातो.) सदा-ए भाऊशाब, वकिलीच्या कामाला, नालायक माणस होत चालला. चिट०-शेट, या वकिललोकांचा एक भ्रम असतो. बापु०-तो भ्रम कुठपर्यंत शेट ? सदा-ते तर बराबरच. चिट०-वः बोलता बोलता, किती लषकर आपण या तिजोरी ऑफिसा जवळ येऊन पोचलों ? ( पडदा उघडतो ट्रेझरीइन्स्पेक्टर वगैरे दिसतात. जवळ जाऊन सलाम करून चिटणीस वगैरे खुर्ध्यावर बसतात.) ट्रे० इ०-चिटणीस, टुमी लोकांनी खबर डिल्यावरून, मी सवटा ट्रेझरी टपासण्याला आलो आहे. चिट०-(अर्ज पुढे करून) साहेब, हाच तो अर्ज. ह्याच्याखाली ज्याने सही केली आहे, तो चांगला इभ्रतदार असून, खोटा मजकूर तो कळवणार नाही. बापु०-साहेब मला वाटते, रावसाहेबांचे याच्यावर काय म्हणणे आहे तें ऐकून घ्यावें ! ट्रे०३०-ओ येस. सिपाय, बुलाब, मामलटदारकू. -शिपा०-जी, साब. (म्हणन जातो व रावसाहेब यशवंतरावमहाराज यासह प्रवेश करतो.) सदा०-ये बडा गम्मत होनार येथे ! चिट०-(मारवाड्यास) स्वस्थ राहून गम्मत पहा आता नुसती ! ट्रे० इ०-मामलटडार तुमचा खजिना बराबर हाय ! महा-साहेब, थोडे माझें नम्रपणाचे विचारणे आहे किं आजचा