पान:देवमामलेदार.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आली होती. हा नाटकात हा एक विशोष दिसून येणार आहे की, इतर नाटकांप्रमाणे तीच तीच पाने पुन्हा पुन्हां बहुधा आली नाहीत. याचे कारण उघडच आहे की, आमच्या या नाटकांतील नायकाचे वास्तव्य फारकरून नोकरीच्या संबंधाने, व नंतर दुसऱ्या अनेक कारणानी एका जागी नव्हते. ह्या मुळे ह्या जगत्कुटुंबी पुरुपाच्या नाटकांत, पात्रे दर प्रवेशांतली बहुतकरून निरनिराळी आली आहेत. हे नाटक आम्ही महाराजांच्या चरित्राच्या आधाराने तयार केलें आहे, चरित्रकारांनी मिळवून ठेवलेली सामग्री आमच्या आयती. च उपयोगी पडली, याबद्दल आम्ही चरित्रकारांचे आभार मानतो. परंतु ह्या नाटकांत, चरित्राबाहेरच्या अशा काही दंतकथाही उपयोगात आणल्या आहेत. जसें महाराजांनी तिजोरिंतून रुपये काढून घेणे, व ते ट्रेझरी इन्स्पेक्टर तपासायला आले असता, बरोबर भरणे. दुसरें-महाराजांनी स्वतःची पत्नि बैराग्याच्या हवाली करणे. आता ह्या दोन्ही दंतकथा, जरि निव्वळ खोट्या धरल्या, तरि पहिली पासून महाराजां विषयींची त्यांच्या काही वरिष्ट अधिकाऱ्यांची तेढी, आणि त्यायोगे महाराजां विषयीं, युरोपियन अधिकाऱ्यांच्या मनाचा निष्कारण वाईट ग्रह किती बलवत्तर झालेला होता, व महाराजांची प्रत्यक्ष भेट होतांच, त्या ग्रहांची कशी इतिश्री होत असे, इतकें जर या अतिशयोक्तिने कळून येण्या सारखे असले, तर ती नाटकांत तरि निदान शोभण्या सारखी नाहीं असें सहसा कोणाच्याने म्हणवणार नाही. दुसऱ्या दंतकथे विषयी तार असेंच आहे. महाराजांच्या ठिकाणी असलेल्या, अतक्यं दातृत्वाची जर एकाद्या कठिण हृदयालाहि पाझर आणण्या सारखी ती असेल, तर ही बिचारी दुसरी अतिशयोक्तिहि रासिकांच्या क्षमेला पात्र होईल. तसेच या नाटकांत जी मोठमोठ्या अधिकाऱ्यांची भाषणं घातली आहेत त्यास आधार, फक्त महाराजांचा त्या त्या अधिकाऱ्यांनी चरित्रांत सन्मान केल्याचे लिहीले आहे. भाषणास फारसा आधार त्यांत नाही, तरी त्या त्या वेळच्या त्या त्या