पान:देवमामलेदार.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अधिकाऱ्यांच्या मनोवृत्ति महत्त्वाच्या जाणन, त्यांची भाषणे नाटकाला साजेशी घातली आहेत. असो, नाटकाच्या सोयी करतां मुळांत क्वचित फेरफारही केला आहे. याचे सहा अंक केले असून,भक्ति शृंगार,करुण,हास्य, शोक, वगरे रस यांत मुख्यतः आहेत. या नाटकाचा प्रयोग पाहिल्याने किंवा हे वाचल्याने जर पहाणाराच्या किंवा वाचणाराच्या वृत्तिवर उदात्तवाचा पगडा बसला, तर लेखक आपल्या श्रमाचे सार्थक झाले असें मानील. शेवटी येथे इतके लिहीणे अवष्य दिसतें, किं जर आमचे बंध चि. रा. गजानन भास्कर किरकिरे यानी आमची उठावणी केली नसती, तर हे नाटक अर्धेच पडून राहिले असते. असो, ज्याने आपले निर्मळ यश गाण्यात मला यशस्वी केलें, क्या श्री यशवं. तराव महाराजांचे चरणी नम्न होऊन ही प्रस्तावना पुरी करतो. कल्याण. विजया दशमी ता. १ । १० । १९०३ नाटककर्ता.