पान:देवमामलेदार.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. आमचे काही बोलणे नाही. शिवाय ज्याच्या बाजूला आज हजारों लोक आहेत, अशा सूर्या पुढे, आपलें काजव्याचें तेज दाखविण्याला जाणे, म्हणजे ते शहाणपणाचें काम नाही. तुमच्या हिताची गोष्ट सांगितली, यांत राग मानू नका. सदा-बरा साव ! दुसरी तोड कशाची आपण बोलला ? चिट०-कळेल ती. बापु०-( मारवाड्यास जवळ येण्याची खुण करून त्याच्या कानांत सांगतो.) समजला ? सदा-हं अशा कांहीं करेल तो होएल. मालत चांगली हाय ! माझ्या मनांत तो अशाच होता. बापु०-अरे म्हणूनच तशा केला. (शिपाई येतो त्यास ) काय ओहरे ? इतकी गडबड कसली आहे ? शिपा०-सहिबास्त्री, आन् तुमास्त्री, आत्तांच्या आत्तां तिजोरी कडे बलावल आहे ? गोरा साहेब तिकडच गेला हाय. चिट०- चला तर बापुसाहेब आता विलंब नको. (शिपायास) चल रे ती दप्तरें घे. (शिपाई दप्तरें घेतो.) बापु०-देवच पावला. चला शेटजी गम्मत पाहायची असेल तर ? (हंसतो.) सदा०-चला. शिवरामपंत तुम्ही येतों को जाते घरीं ? शिब०-जातो आम्ही. वकि०-(चिटणीसास ) बरे आहे, आम्ही घेतों रजा ! चिट०-चला बोलतच जाऊं असे. रस्ता एकच आहे तुमचा अमचा. वकिल-चला बापुसाहेब, तुम्ही तर सर्वांच्या पुढे पाहिजेत. कारण ह्या नाटकांतले सूत्रधार आपण आहा ! (हंसतो) -बापु०-कसले सूत्रधार, आणि कसले विदुषक ? साधु पुरुषाच्या विरुद्ध कुभांड घेणारे म्हणजे पापी आम्ही. (चालतात.). चिर-पण मी ह्मणतो, साधुपुरुष असला तर त्याच्या सत्कृत्या बद्दल, त्यांच्या हजारवेळ पाया पडावें. म्हणून त्याची दुष्कृत्ये असतील तीही छपवावी किं काय?