पान:देवमामलेदार.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जवान्या घेतल्या. त्यांनी सांगितले, आम्ही रावसाहेबास पैसा कर्ज झणून दिला नाही. धर्मार्थ दिला आहे. झाले ते सर्व बरें झालें, आतां दुसरी एक तोडसदा-दुसरा अर्ज तयार करते का आता साव? बापुसाहेब-दुसरा कशा संबंधाचा ? सदा-आमाला काय संबध माहित? आमी काय लिवणारे आहो ? तुमी दुसरा अर्ज करते काय आशा मी पुछतो तमाला ? बापु०-हे ते सगळे प्रकर्ण, ( देतो) वाचा. तुमाला वाचतां येत असेल तर ! ( मारवाडी घेतो.) वकिल-(शिवराम पंतास) को शिवरामपंत, तुझी आज कुणीकडे इकडे ? तुह्मी या भानगडीत आहां की काय ? (स्वगत) पक्की भांडखोर असामी, लोकांचे कर्ज घेऊन, भांडत बसणारा; याला मी पुरा ओळखतो. शिवराम-नाही. आपला सहज या शेटजी बरोबर; आपल्यापाशी थोडेसे काम आहे माझें. चिट-का भाऊसाहेब, कोठेहि बसा, तुमच्या कुळे अगदी पाठीस लागलेली ना? वकि-कसली, कसली? अहो किती झालें तरि अधिकाराची गोष्ट वेगळी आहे. सदा-आता आमी भाऊसाहेबाना विचारतो, दुसरा अर्ज करावा का नाय तो? काय भाऊसाब, तुमचा मत कशा पडतो या कामात ! वकि-माझें मत विचाराल शेट, तर तुम्हांला खरे सांगतों, आम्ही वकिल म्हणजे, कसे आहों की, कोणाची नुकसानी म्हणजे, आम्हांला आनंद. जरी आमच्या पक्षाचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटते, तरी ते तेवढ्या पुरतें. पण ह्या वकिलीच्या धंद्यात जो पडला त्याला, खरी आनंदाची, आणि उकळी फुटवणारी, खबर म्हटली म्हणजे, नुकसान. लक्ष्यात असू द्या की, तुम्हीं असल्या लोकांच्या नादी लागू नका. खड्डयांत पडायचे असेल तर