पान:देवमामलेदार.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ अंक १ ला. चव०-महाराजांनी शांतपणे त्याला बोलावले, तेव्हांच आम्हांला वाटले याची समजूत पडेल ? शिव०-( वेडावून ) छमजूत पडेल. सदा०-अशा शंभर रावशाब आला म्हणन काय, पैशाच्या कामांत शमजूत काढतो काय ? पहि०-परंतु ही रावसाहेबांची दया एकादे वेळी त्यांना भोवेल; कारण हे धर्मराज्य नाही, कायद्या कलमांचे राज्य आहे हे. दुस-पण मला नाही वाटत, असा प्रसंग त्यांच्यावर येईल! पहि०-देव करो, आणि तसा नच येवो. चव०-अहो हीच सर्वांची इच्छा ( पाहिल्या सारखें करून ) अरे ह्या माडूने आणि शिवरामपंतांनी आपले भाषण एकले वाटते? (जातात). सदा०-चला. कुटाळ लोका संगती आमाला काय करायचा है ? शिव०-अहो शेट, हे आले भाउसाहेबांचे घर. मारतां हाका का मारूं मी? सदा०-(शिपाई दिसतो त्यास ) भाऊसाब घरांत हैत का? शिपा-त्ये चिटणीस साहेवाकडे गेल्यात. चिटणीस साबांची सवारी आलीया नाही का, बडचा सावाबरोबर ? नाही तर दोन घंटयाशी या, गांठ पडेल. सदा-बरें आहे. चला तर तिकडेच जाऊं. चिटणीस साबांची भी आपली ओळख हाय, त्येचीभी यांमंधी सल्ला पायज्ये. शिव०-चला, पण हा प्रथमच नन्नाचा शकून चांगला नाही. सदा०-शकूण वाकूण आमी तो कायभी जाणते नाही. ते तुमचा बामणाचा काम. शिव-चिटणीस साहेबांचे राहण्याचे ठिकाण आहे की माहित तुम्हाला ? सदा-तुमी चला. आमाला शगळा माहित हाय. नशला म्हाहित तोभी आमी माहित करून घेते. (दाखवून) ये पलिकडला वाडा चिटणीसांचा. या मंदिच ते उतरत असतात, इथे आले तेव्हां