पान:देवमामलेदार.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. चव०-अहो मारवाज्याचा धंदाच तो; लोकांनां असें मारायचे ! सदा०-(एकीकडे ) लोकाना मारायच्या. लोका कशाला मरतात? त्यांना आम्ही बोलावणा पाठवतो काय मरायला या अशा ! शिव०-तुम्ही असे दांत ओठ चर्चावून रागाऊं नका हो. काय त्यांचे बोलणे चालतें तें ऐकून घ्या. सदा०-घेतला ऐकून. पहि-पण आज माडू संतापला खूप. “माझा व्याज गरिः वाचा तुम्ही बुडवू नका" असे शंभर वेळा नाचत म्हणाला असेल. सदा०-(एकीकडे ) तुझा बाप नाचला असेल. मी तो माझा ब्याज मांगत होतो. दुस-त्या शिवरामपंत द्वेष्टयांची अशीच स्थिती झाली. होता कां तुम्ही त्यावेळेस? सर्व०-हो, हो, हो. (हंसतात.) पहिला०-काय लोक एकेक गमतीचे असतात हो. मुर्ती तेव. व्या प्रकृती. प्रतिवादिला त्याच्या, शिक्षा न देतां दंड केला, तर जो संतापला, आणि ह्मणे, रावसाहेब, मी बोलतो त्याची माफी असावी. आपण न्यायी आहा. या हरामखोरांनी, आजपर्यंत माझ्या इस्टेटीत हव्यातशा अफरा तफरी करून, नुकसान केलें माझें. तर सरकार याला अगोदर माझ्या देखत, श्रृंखला बंधन करा. याला जेव्हां घोंगडीचा चोळणा नेसवाल, तेव्हां मला बरे वाटेल ! याला करवंटींतून पाणी पिताना पाहिन तेव्हा मला आनंद होईल सरकार. सरकार सरकारची तर त्यांनी गर्दीच उडवली होती. शिव-करूं उद्धारगत ? याला शिव्या देऊं कांहो शेट, त्याच्या समोर जाऊन? दुसरा-तो मूर्ख खराच. परंतु त्यांचे म्हणणे, मी म्हणतों काही अंशी तरि बरोबर होतें. शिव०-(एकिकडे ) असें म्हण. तिसरा-पण रावसाहेबांनी त्याची थोडी समजूत घातली का? आपसांत भांडणे चांगले नव्हे-वगैरे पुष्कळ. काहीं बाकी ठेवले नाही सांगायचें !