पान:देवमामलेदार.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. सदा-शिवरामपंत, तमे दक्षणी लोक खाली वाचाळ पंचविशीकरनेवाले ! आबी मैं बध कैसा करूं तो? ऐशाच वकिलाकडे जाते पहिले ! तो भाऊशाब वकिल फार चांगला आहे ! ये मुर्दाड वकिलाचा कामच असा. (बोटाने दाखवून ) तो बघा कशा तोंड लपवित चालला आहे ! शिव०-(पाहून ) हाच का आज तुम्हीं वकील केला होता? ह्याला वकील म्हणतो कोण? हा ठोंब्या वकिल म्हणन प्रसिद्ध आहे. तुम्ही भाऊसाहेबांकडे जाणार म्हणता, तर मीही तमच्या बरोबरच येतो. आणि प्रथम त्यांना हेच विचारायचे की, कायद्यांत असे एकादें कलम आहे का, की, त्याच्या योगानें भयंकर गुन्हेगाराला सुद्धा शिक्षा न देता आजिबात नुसत्या दंडावरच ती भागवण्याचा माजिष्ट्रेटास अधिकार आहे ? सदा-तुमचा लोकांचा बिघडतो इथेच ! माझ्या संगती येउन, तेथें तुम्ही काय करणार ? पहिले मला बोलू देणार, कां तु. म्हीच धुसणार? शिव-बरे बोवा, तुमच्या बरोबर आम्ही येत नाही ! आम्ही आपले मागूनच जाऊं. आणि ते बरोबर आहे तुमचे म्हणणे. असली कामें म्हणजे वकिलांस शांतपणाने समजाऊन दिली पाहिजेत. सदा-माझा तशा बोलणा नाय. तुह्मी येऊ नका, अशा मी कुठे ह्मणतो ? एकाने केला की, दुसरा करतो ये तुमच्या लोकांची रति सांगितली मी! आणि तशल्या लोकांच्या हातून काम होत नाही, अशा ह्मणतो मी. तुम्हीच बोला माझा ह्मणणा खरा किं खोटा! शिव-( दाखवून ) ही मंडळी कचेरीतून येत आहेत. तुमच्याच विषयीं, काही बोलताहेत मला वाटतें! ऐका, (बाजूला होतात. दूसरे दोन चार गृहस्थ बोलत येतात.) पहि०-खपच संतापला हं तो माडू आज? दुस-व्याजं घ्यायला पाहिजेत हवी तशी, कशी मिळणार ? तिस-मग ही अशी स्थिति होते, रुपयाला दोन आणे; काय लेकाहो व्याज घेतां का काय करता?