पान:देवमामलेदार.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ दवमामलेदार. सांगितले काकांची समजत करतो आपण कष्टि होऊ नये. बोली टळली त्यांत आपल्याकडे काही दोष नाही. रुपये काय फिटून जातील. सत-(घोड्स ) शाबास, शाबास, धोंडू तूं धन्य आहेस. महापातकी चांडाळ मीच. ( हरि हरि म्हणतो.) धोंडू०-इथं येऊन बघतो तर हा प्रकार ! (किर्द दाखवून ) हे पहा त्या भित्तीला रुपये जमा आहेत. विनाइंद्र धन्य अहा यशवंतराव महाराराज धन्य अहा. इंद्र०-ज्याचा कैवारि देव. त्याला काय हो ! किती अडचणी आल्या म्हणून काय होणार त्यांचे वाकडे ? विना-यांत काय संशय ? नोकरिला नालायक म्हणून काही दृष्टांनी अर्ज केले, राजिनामाहि यांनी इकडून दिला, पण शेवटी मिळालीच नोकरी. खुद्द ऐलिस साहेब, म्यान्सफिल्ड, साहेबा सारख्या कमिशनरांनी, त्यांच्या कामांत मन घातले होते. असो असाच त्यांचा जय होवो. सत-महाराज एकदा होऊ द्या. (सर्व यशवंतराव महाराजकी जय अशी गर्जना करतात.) विना०-बरे आहे पाटिल बोवा, राम राम. सतरा-राम राम. इंद्र-राम राम. सतरा-राम राम. (जातात. पडदा पडतो.) प्रवेश चौथा समाप्त. प्रवेश ५वा. (स्थळ-गांव सटाणे. शिवरामपंत आणि सदासुख मारवाडी कचेरीच्या बाहेर बोलत येतात.) शिव-शेठ, हा निकाल ऐकून, माझ्या तळव्याची आग मस्तकास गेली आहे !