पान:देवमामलेदार.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. आठवण होते. आता तो प्रत्यक्ष बादशाहा विष्णुचा अंश होता. हा यःकश्चित पाटिल आहे. ( उघड ) बेदरच्या बादशाहाची गोष्ट, पाटिल बोवा, आपल्याला ऐकन ठाऊकच असेल! तशीच स्थिति आपली होत चालली आहे. सत-तो बादशहा. मी यःकश्चित पाटिल. माझी त्याची कसली बरोबरी करता ? देवाने आपले वचन राखलेन् नी मला वेड लावून गेला झालें. आता हा देह त्यालाच अर्पण केला. महाराजांच्या पायर्यावर मी आपल्याला वाहून घेणार ! हे रुपये आणि त्यांच्या कडून आलेला शंभर रुपयांचा माल गुळ, तांदूळ, सारे त्यांचे त्यानाच परत देणार. हा (तिरस्काराने ) संसार नको वीट आला ह्याचा. धोंडु, झुगरुं आता झाले आहेत मोठे. त्यांचे त्यांना समजायला लागले आहे. आता हरि हरि म्हणत, स्वस्थ-आहाहा! (हरि हरि म्हणतो) किती गाड लागतें देवा तुझें नांव ! आतां मुळीच तुझ्या नांवाचा मला कंटाळा यायचा नाही. आहाहा, तुझ्या त्या मूर्तीला नेहमी हाक मारावेसे वाटते ( हरि हरि म्हणतो.) विना- ओहोहो, वैराग्याचा हा पूर्ण झटका आहे. इंद्रधोंडू-आत्तांशी दोन तीन दिवस त्यांचे असेंच चालले आहे. मी सटाण्याहून महाराजांस पोचवून आलों तेव्हांच वृत्ति पालटलेली दिसली मला. कधी कधी तर “सतरा पटेल सतरा पटेल" असे आपण आपल्यालाच हाका मारित असतात हळ हळू. इंद्र-सटाण्यास आपली घरची गाडी नेली होती तुम्ही महाराजांना विना-आणि तेथे महाराजांना पैसे मिळाले नाहीत ? धोंडू०-होय. वळणा शिवाय, कोण देणार ! महाराजांनी पुष्कळ यत्न करून पाहिला पण नाही. शेवर्टी शंभर रुपयांचा, आपल्या नांवावर उधार माल घेऊन तशी शंभरांची भरती दिली. आणि शेवटी महाराज म्हणाले, चुलत्याला म्हणावें “बोली प्रमाणे पैसे दिले नाहीत. राग करूं नये, लवकर फेड करतो, माझा त्रास करूं नये." ते त्यांचे शब्द ऐकून मला गहिवरच आला. मी