पान:देवमामलेदार.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ देवमामलेदार, राहिलो. माझ्या अंत:करणाला अतिशय खाते हो खाते हे ! (सुस्कारा टाकून ) पुन्हां कसला तो आतां दृष्टिस पडतो ? अहाहा ! सतरा पटेल, सतरा पटेल, किती त्याची मधर आणि गंभीर वाणी ! सव्या फुकट जन्मलास रे सव्या. विना-(मनति )याच्या मनाला ही गोष्ट खरोखर खात आहे. हा निव्वळ भाविकपणा तर खास नाही, असा नुसता शिपाई येऊन गेला, आणि तो पुन्हां दिसला नाही, मणन कोणाला इतकें वाईट वाटणार नाही. तेव्हां खास त्या शिपायाच्या कृति मध्ये, बोलण्यामध्ये दैवीच चमत्कार असला पाहिजे. तो दैवी चमत्कार अनुभवा शिवाय कळणार नाही. तो नास्तिकाला समजणें तर अगदीच अशक्य. सूर्य असा असा आहे, ह्मणून जन्मांधाला किती सांगितले, तरि त्याची त्याला कशी कल्पना करता यावी ! दैविचमत्कार अमच्या हिंदुस्थानांत फार होतात. तसे इतर देशांत होत नाहीत. आणि तसल्या देशांतील लोकांच्या सहवासानें, आमचा आमांस विसर पडतो, आतां ही बातमी “ खानदेश वैभव" मधून प्रसिद्ध केली पाहिजे. सतरा०-आहाहा ! देवा तुझें चरित्र अगाध आहे, तुझी लिला मनाला हरण करणारी आहे. दगडांत आणि हिऱ्यांत जितकें अंतर, बाभळीत आणि चंदनात जितकें अंतर, पितळांत आणि सोन्यांत जितकें अंतर, काक शब्दांत, आणि कोकिळ शब्दांत, पण छेह्या उपमांनी तुझें स्वरूप आणि तुझा तो स्वर, ह्या पैकी, काही एक कळण्या सारखें नाही. जसें त्यांत आणि तुझ्यात मनस्वी अंतर, तसेंच माझ्यांत आणि तुझ्यात देवा केलेंसना ! तहानेंत आणि पाण्यात जितकें अंतर तितकेंच देवा तुझ्यात आणि मझ्यात अंतर ! ( सुस्कारा टाकतो.) इंद्र०-(मनांत) अरेरे, ह्याच्या मनाला ही गोष्ट अतिशय डांचत आहे ! तेव्हा काही तरि येथें अनुभव आहे. पाण्याला खाली उष्णता असल्या शिवाय उकळया फुटायच्याच नाहीत ! विना०-याची ही स्थिती पाहून मला बेदर बादशहाच्या गोष्टिची