पान:देवमामलेदार.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ला. इंद्र-मग भगवान चौधरीकडे लागलाच तपास केला की नाही? सत-येईल इतक्यांत, ह्मणून चार घटका वाट पाहिली, आणि मग, भगवान चौधयाकडे आहे कि नाही, पाहून ये तो शिपाई, ह्मणून झुगरूला आमच्या पाठवलें ! विना०-( झुगरूकडे बोट दाखवून ) हाच तुमचा मुलगा झुगरू वाटते? सतरा०-(मान हालवून) होय. त्याला विचारा हवीतर ती गम्मत. झुगरु-भगवानकाकाला पुसतो, तर तो ह्मणे कुठला शिपायी, कोण, माझ्याकडे सकाळपासून कोणी आलें नाहीं; मग सगळ्या गांवांत शोध केला तरिबी पत्ता नाही. सतरा०-अहो संध्याकाळ पर्यंत मला आशा होती, म्हटले कुठल्या जवळच्या गांवांत गेला असेल कामा बिमाला, येईल सं. ध्याकाळी. पण जेव्हां रात्र पडली तेव्हां मात्र माझ्या मनांत निरनिराळे विचार यायला लागले, आणि हा गृहस्थ गेला तो पावती न्यायला अझून कसा आला नाही, ह्मणून मला आश्रर्य वाटले. विना-पण तो यायच्या अदल्या दिवशी तुमाला काय वाटले होतें ? सतरा०-खरेंच पुसाल तर मला ते सांगण्याची सुद्धा शरम वाटते. आदले दिवशी म्यां गाढवाने महाराजांना शिव्या सुद्धा दिल्या मनातल्या मनांत. इंट-कांहीं खेद करूं नका आता. झालें तें झालें, होतेच आहे. “ साहा दिवस झाले अझून का रकम येत नाही धुळ्याहून येणार ती" असें मनांत येऊन, तसे तुमच्या कडून झाले असेल. त्यांत कांहीं नवल नाही मोठे. किती झालें तरि संसारी लोक आपण ! सतरा०-पण ह्मणूनच देवाला संकट पडले हो. सातव्या दिवसाची बोली. भक्ताची बोली खरी करण्या करितां देवाला परदेशी व्हावे लागलें ! शिव, शिव, धिक् माझें जिणें ! देवाला माझ्या मुळे. त्रास पडला, आणि त्रास पडून शेवटी मी भर समुद्रांत कोरडा