पान:देवमामलेदार.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० देवमामलेदार. इतके शब्द त्यांच्या मुखातून निघाल्यावर माझ्याने मुळीच आढे वेढे घेववले नाहीत. (सुस्कारा टाकून ) आहाहा ! तो शिपाई माझ्या डोळ्या समोर दिसतो हो ! फुटक्या नशिबाचा मी, की त्याला नुसतें 'ये जैस' सुद्धा म्हटले नाही. इंद्रसिंग-नशिब पाहिजे पाटिल बोवा. त्या शिवाय व्यर्थ आहे. तुम्हाला नुस्तें दर्शन तरि झालें! विनायकराव-माटिल बोवा तुम्हांला खोदून विचारतो, याचा राग मानू नका. मी मुद्दाम शिंदखेड्याहून तेवढ्या साठीच आलों आहे. अलिकडच्या लोकांचा असल्या गोष्टींवर विश्वास बसत नाहीं; ह्मणून प्रत्यक्ष जाऊन पहावें, ह्मणजे मंडळींची खात्री करण्यास ठीक पडेल, हा माझा येथे येण्याचा उद्देश. महाराज येथून गेल्यावर कितव्या दिवशी बरें तो परदेशी येथे आला ? सतरा-बरोबर सातवे दिवशी. पहाटेस मी उठून नामस्मरणाला आरंभ करतो, इतक्यात-"सतरा पटेल दार खोलो" असें ह्मणाला, आणि दारावर थाप मारली. इंद्रसिंग-पुढे ? सतरा०-आंतून विचारलें मी, “कोण आहे " ह्मणून. तर "आप दरवाज्या खोलकर बाहेर आव, फेर मै कोन हूं ये कहूंगा" असें म्हणाला. मी दरवाजा उघडून डोकावतो, तो "आप सतरापटेल हो के दुसरे कोई हो " असे त्यांनी मला खडसून विचारले. विना-मग त्याला तुम्ही काय सांगितलं ? सतरा-मीच सतरा पाटिल, असे सांगितल्यावर, कुठून काय कामा करितां आला, म्हणून विचारणार, तोंच आपण म्हणता, " जसवंतराव महराजनें, आपके पांचसो रुपिये पोहोंच्यानके वास्ते, आपके तरफ मेरेकु धुलियासे भेजा है. ये मोहरबंद थैली देखकर, खोलके पाँचसो रुपीये आपके हाथसें मोज लिजीये. और रुपिये मिले बद्दल, पावती लिखके राखिये. जबतक मै भगवान चौधरिक घरसे जाके आता हूं तो अजन येत आहे, आणि मी पावता राखताय, (हंसतात)