पान:देवमामलेदार.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ला. १९ सुंद०-अगबाई, इकडे का आपण खर्चणार माझे दागिने ! आणि मला धन्य करणार ! जळ्ळी ती धन्यता ! नको बाई मला ती! महा०-ती तुझ्या दैवींच लागली आहे. नको म्हणून कसे चालणार ! नृसिंहाची तुझ्यावर कृपा ती हीच. सुंद०-करा काय मेलं हवं ते करा. आपण कांहीं केलं तरी होणार कधी चुकत नसतं! महा०–आर्ता कशी बरें माझी लाडकी बोलली ! आता खरी शोभतेस मला तूं ! सुंद०-अशी भुंडी शोभते का? (सुस्कारा टाकून ) आतां आपण तिकडं गेल्यावर मला दागिने तरि काय करायचे आहेत? आई, जगदंबे, लवकर सुरक्षित परत येणे होईल असें कर, म्हणजे एकशेआठ दंपत्ये तुझ्या नांवानं सगिन ! महा-कांही काळजी करूं नकोस, त्या नृसिंहाला काळजी आहे. चल आतां दोन घटका स्वस्थ पडूं. कारण आतां पहांट होईल. ( पडदा पडतो) प्रवेश ३ रा समाप्त प्रवेश ४ था (स्थळ-गांव, पाटण. सतरा पाटलाचें घर.) पात्रे-सतरा पाटील, इंद्रसिंग राऊळ, विनायकराव शारंगपाणी, धोंड, झुगरू व इतर मंढळी बोलत आहेत.) सतरा०-खोटें कशाला सांग महाराज ! खोटं सांगून मला काही फायदा आहे का ? आपल्या पदरचे पांचशे रुपये घालवून, मला काय यांत मिळायचं होतं, असें आपल्याला वाटते ! खरें पुसाल तर माझी अडचणच होती, घरांतली अडचण वाजला ठेऊन, अगदी गळ घातली महारांजानी, म्हणून त्यांना मी तावड. तोब रुपये दिले. व्याज मी महाराजां पासून कधीच घेत नाही " चौधरी या समयीं नाही म्हणू नका, हे मी तुमचे रुपये धुळ्याहून परत करीन, इतक्यावर तिथे सोय नच जमल्यास थेटहून पाटवीन"