पान:देवमामलेदार.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. माझ्या जिवावर येतं, कारण एरवी कोणी मागायचंच नाहीं दागिने ! दिले तर पाहिजेतच आतां, कारण फार ओढ्न धरलेलं अवडायचं नाही! आणि फार कोणी अंगचटीसहि जाणार नाही. ( उघड ) कधी बाई असा प्रसंग नाही. काय ही वेळ आणलीस देवा ! या हातानं कधी असं काढणं झालं असेल, किंवा मी आपल्या हातांनी कधी काढून दिले असतील, तर ते काढवतीलना ? महा-अगदी वाईट वाटू देऊ नकोस. आनंदाने काढून दे, देवाने काही वाईट प्रसंग आणला नाही, चांगलाच आणला आहे. आपल्या अंगांतले सत्व दिसून येते अशा वेळी. पुराणांतल्या चांगुजच्या गोष्टी ऐकतेसना ! मग नुसते दागिने द्यायला तुला कठीण वाटते ! सुंद०-बाई माझा काही हात वाहत नाही, आपणच घ्या कसे ते काढन ! महा०-(तिच्या अंगावरील दागिने काढून ) तूं भिऊ नकोस, पुन्हां दागिने मिळणार नाहीत म्हणून ! वेळ आली की पुन्हा मिळतील, पुन्हां जातीलहि. त्या बद्दल खेदच करीत जाऊ नकोस. जसा प्रसंग पडेल तशा धैर्याने वागत गेलीस, म्हणजे मला किती आनंद देशील ! ह्या वेळेस तूं मला फार आवडतेस. ( तिला पोटाशी धरतात.) सुंद०-किती बाई निष्ठूरपणा हा. इतकं कठीण अंतःकरण असेल, असं नव्हतं वाटलं मला, नुसतं गोड गोड बोलायचं. आपल्या मनात असेल तसं करायचं ! केलं तर करा, पण मेले हे दागिने आतां मोडून त्या मेल्या साहेबाबिहिवाला का द्यायला न्यायचे आहेत? बरोबर नीट ठेवावे ! लांब एवढ्या जायचं, केव्हां काय होईल याचा नेम नाहीं, उपयोगी पडतील, नाही तर तसेच आणावेत. यांचं दुसरं नाहींना काही करायचं, सांगावं गडे लवकर ! महा-अग, साहेब पैसा घेत नाहीत देतात उलटा! ह्या दागिज्यांचा उपयोग फार चांगल्या कार्याकडे होणार आहे. अग, ह्याचे पैसे गरिब आणि कुटुंबवत्सल लोकांच्या उपयोगी पडणार आहेत. धन्य आहेस तूं !