पान:देवमामलेदार.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. सुंदरा०-आपली वाट ती माझी वाट ! पण बाई नोकरीचा का एवढा विट आला आहे ? नोकरि मुळे सुख आहे हो. नोकरीचं वैभव आणिक असतं! मग कशी सांगं बाई नोकरी नको ह्मणन ! मी काढीन हो दिवस आपण येस तों पर्यत ! पण अझून पर्यत हे पाय अंतरले नव्हते, म्हणून जरा वाटतं-( गहिवरून महाराजांच्या गळ्याला मिठी मारते.) महा०-(तिचे डोळे पुसन) तूं समजतदार आहेस; अग, या संसारांत मानून घेतले तर सुख आहे. कधी सुखाचे दिवस, कधी दुःखाचे. देवांना सुद्धा हे चुकले नाही, मग आपण तर यःकश्चित मनुष्य. सुंदरा०-हो; सितेच्या, द्रौपदीच्या गोष्टी अशाच पुराणांत आहेत. त्या तर देव होत्या, त्यांनी जर दुःखं सोसली, तर मी काय मनुष्यच? पण बाई जपून जायचं. फराळाचं बरोबर देईन म्हटलं तर ते गाडीच्या विटाळाचं चालत नाही, बाकी भाऊजी आहेतच बरोबर; तेव्हां तितकी काळजी कमी वाटते. तिथं उतरण्या सव. रण्याच्या तरि सोई आहेत कां नीट? चाळिसगांवला आगागाडीत बसून मुंबईला जायचे; आणि मग पुढे ते गांव घोघो को काय, ते किती लांब महा०-जवळ आहे तेथून. बोटीत बसून पुढे जायचं. काही काळजी करूं नकोस. श्रीनरहरी आहे आपला कैवारी. सुंद०-अगबाई, पुढं बोटीचा का प्रवास आहे ? मी म्हटलं जवळ कुठं असेल मुंबईच्या, मेली कांही तरि गरज इतक्या लांब जायची! दुष्ट दृष्ट वाई लोक! एकाद्याच्या चाहाड्या सांगून कसं वाईट करावंसं वाटतं ! कद्री कल्याण होणार नाहीं मेल्यांचं ! महा०-छे, छे, अग असें भलतेंच काय बोलतेस ! त्यांनी काय दुष्ट पणा केला ? आपले कर्मच तसें ! त्यांना वाईट बोलन आपली जीभ कां विटाळतेस ? आपले प्रारब्ध जर चांगले असते तर त्यानां ही दुष्ट वासनाच झाली नसती! सुंद०-किती बाई भोळे पणा हा ! कोणाची निंदा आवडत AM