पान:देवमामलेदार.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ देवमामलेदार. सुंदरा-जसं काही, इकडं माहितच नाही वाटतं उदास पणाचं कारण ? माझ्याशी हा असा स्वभाव आहे हे कुणाला तरि माहित असेल कां! पुरषांना काय मेलं कसलं मोठं संकट येईना त्याचं काहीच वाटत नाही. पण बायकांना कसं होत असेल अशा. वेळी, हे नकोकां समजयाला पुरषांना ? राजीनामा देण्याची बुद्धि कुठून आठवली बाई,-आणि त्यापाई आता ह्या लांबलांबच्या खेपा. हे पाय मी अंतरु द्यायची नाही. यशवंत०-( हंसन) अगदी वेडी आहेस तं, शहाणी शहाणी समजत होतो ती ! दोन दिवस कामा करतां तिकडे जायचे आहे, का हौशिने जायचे बरें यात्रेला? साहेबांची भेट होऊन काम झालें किं, लागलीच परतायचे. सुंदरा-पण मला किनई बरोबर न्यायचं व्हावं गडे ! मी कांही नुस्त्या गोड गोड भाषणानं ऐकायची नाही. हे काय मेलं हे, सगळ्यांची दया येते आणि माझीच कशी नाही बाई ! मी काही बरोबर आल्या शिवाय रहायची नाही हो, मी आपली बांधाधांध करून ठेवली आहे! यशवंत-अगदी वेडी खरी. (तिच्यागळ्यांत हात घालून) तुझी दया मला येत नाही? तू मला जड का होणार आहेस बरोबर. तुझ्या योगानें तर हा प्रवास मला जास्त सुखाचा होईल. पण तुझे सासु, सासरे आहेतना इथे? त्यांची सेवा नको का तुला करायला ! त्यांना वाईट वाटेल असें तूं कधी केले आहेसकां ? सुंदरा०-( हंसत ) मग त्यांना घेऊन चलावं गडे ! नाही तर आपणच जाऊं नये ! कुठन तरि आडवायचे कसं अगदीं कि, मेली बोलायला जागाच राहूं नये ! महा०-बरें आहे तर! नको जाऊं मी? नको नोकरी ? सांगत असलीस तर- मला नोकरीचा मना पासून विट आला आहे, मोकळा तरि होईन. तुझी तयार आहेना ? त्या वृद्धांची काळजी वाटते. पण दादा आहेतच. ते काही त्यांचे कमी पडू देणार नाहीत. आतां लोकानां जरा वाईट वाटणार आहे, पण त्यांची समजत करता येईल.