पान:देवमामलेदार.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. नाही, स्तुति आवडत नाही, कित्ती कोणी नुकसान करा, इकडं त्याचं काही नाही. कोणी शिव्या दिल्या, नासकं कुचकं बोललं, काम ऐकलं नाही, घरांतल्या वस्ता 'चोरून नेल्या, तरी आपलं ज्याचं नांव तें ! एक शब्दानं तरि त्याला नुसतं दटावायचं. मुळी रागावणं जसं काही माहितच नाहीं ! बाहेर रागावायचे होत असेल तर मला काही माहित नाही, पण धरांत तर मी अजून पर्यंत पाहिलं नाही, लग्न झाल्या पासून इतके दिवस झाले तरि ! महा०-अग, राग हा मांग आहे. त्याला शिऊं नये ! सुंद०-तसंच आतां बोलले तर इकडे राग येईल ! (हंसून ) अगबाई, राग येत नाही म्हणून आत्तांच ना मी ह्मणाले, आणि पुन्हां काय हे माझ्या तोंडातून आलं राग येईल म्हणून ! हे मेले सगळे धरांत पडून राहिलेले सोळ भोक, म्हटलं, येतिल का कांहीं आतां कामाला ? त्यांना अगदी पोटच्या पोरासारखे वागवायचं तें! जरा कोणी त्यांना लागेल, असे बोलतां सुद्धा उपयोगी नाहीं ! वेळेला आता उपयोगी पडेल भलतेच ! महा-अग, त्यांच्या नशिबाने ते खात आहेत, आपण काय इथे घेऊन आलो आहों बरं? त्यांच्याच नशिबाच्या जोरावर, दुसयाला आपल्या उपयोगी पडण्याची वासना होते. हेच कोणी आपले भाऊ किंवा दुसरे कोणी आप्त असते तर त्यांस आपण टाकले असते ! ना इलाजास्तव ते राहतात आपल्या इथें, असें समजलें, पाहिजे आपण! सुंद-नाइलाज ! झालं आहे काय ? धट्टे कट्टे चांगले हात पाय देवानं दिले असून! महा-अग, हीच ती तुझी कोती समजूत ! त्यांच्या दैवींच तसें सुख आहे, असे समजावें ! त्याच्या बद्दल चांगले बाटावें तर उलट वाईट का वाटुन घेतेंस ! आपले काय ते घेत आहेत ! त्यांचं तेच घेत आहेत! अग, हा संसार म्हणजे एक खेळ आहे. यांत चार दिवस खेळन जायचे आहे ! त्यात वाईट आणि बरें काय वाटायचे ! मौजेने खेळायचे ति. (तिच्या हनुवटीस हात