पान:देवमामलेदार.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ अंक १ ला. आहे. बरोबर कोण दोघे बंधू वासुदेवराव, बळिराम दादा, काळ शिपाई आणि ब्राह्मण असेल शिवाय ? माध०-होय, मर्गाचायीच्या मुहुर्ताने उद्या पहांटस जायला निघणार आणि चाळिस गांवाहून पुढें मुंबईस जाणार आगगाडिने तेथे कोणी आप्पा वाळवेकर म्हणून लिंगाईत व्यापारी आहे, त्याच्याकडे उतरणार आणि मग बोटिने पुढे जाणार, वळणाचे पत्र । घेतले आहे वाळवेकराच्या चांगला आहे म्हणतात तो सज्जन. गोविं०-(ऐकलेसें करून माधवरावास) तिकडे महाराज कशाला हाक मारताहेत पहा तुम्हाला ? माध-काय ? ( गडबडीने जातो, पडदा पडतो.) ( महाराजांची निजायची खोली, महाराज व माधवराव बोलत आहेत असा पडदा उघडतो.) महा०-या प्रमाणे व्यवस्था ठेवायची, आलेना लक्ष्यांत? तुम्हाला सांगायला नकोच. माध०-सांगितल्या प्रमाणे सर्व करतों, काही काळजी करू नाही महाराजांनी महा-बरे तर, जा तुम्ही निजायला दमले असाल. तुम्हांला आत्तांशी भारी काम पडतें माधवराव ? माध०-( जातां जातां आपल्याशी) अहाहा किती दयाळु धनी हा! अशाची सेवा कितीही करावी लागली तरी श्रमाचा भास सुद्धा होणार नाही. निर्मल अंतः करणापासून निघालेल्या गोड शब्दांनी तेव्हांच मन हरखन जाते. आतां झोप मला किती गोड लागेल ! (जातो) (सुंदरा बाई प्रवेश करतात.) महा०-(सुंदराबाईस आपल्या हाताने पलंगावर बसवून ) प्रिये, तो मखकमल रोजच्या सारखे दिसत नाही अशी उदास कां बरे झालीस आज ? आल्याबरोबर प्रसन्न मुखाने माझ्याकडे पहायचे, आणि मला हसवायचे ते विसरलीस वाटते ?