पान:देवमामलेदार.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकला . दान धर्म करण्याचे कामी व त्यांच्या तरतुदीच्या खटपटीत, मामलेदार यांचा सारा वेळ मोडत असल्या मुळे, व तसाच सर्व लोकांवर दया करण्याचा ह्यांचा स्वभाव असल्यामुळे, ह्यांस सरकारी काम करण्यास, पाहिजे तसा वेळ न सांपड़न, महत्वाची कामें दिरंगाईवर तुंबन राहून, लोकांस वक्तशीर न्याय मिळत नाही. शिवाय त्यांस तालुक्यांत कायद्याविरुद्ध लोकांचे कर्जहि पुष्कळ झाले आहे." वगैरे दुष्टांनी, नाही नाही ते उपाय केले. चौकशा सरकार मार्फत झाल्या. पण त्या नृसिंहाला काळजी. पेठ पारोळे, येथील सावकार लोकांनी चौकशीत स्पष्ट जबाव दिले की, " आम्ही मामलेदार यास कर्जाऊ पैसा, केवळ आमच्या खशीने दिला आहे. त्याचा व्यय मामलेदार यांजकडून धर्म कृत्यांकडे झाला आहे, ह्मणून आमचा तो पैसा, त्याज कडून परत होई पर्यत, तो आमचाच धर्म झाला, असें अम्ही समजतो. पुढे कदाचित् तो पैसा आमचा आम्हांस त्यां कडून परत आला, तर मग तो धर्म त्यांचा झाला, असे आम्ही समज, " गोवि०-ह्याच गोष्टी महाराजांना नोकरी विषयीं वैराग्य येऊन राजिनामा देण्याला कारण झाल्या. हरि०-( हळूच ) राजिनामा दिलातर ! पुरा--( हळूच ) आतां राहण्यात अर्थ नाही. ( उघड ) मग आता पुढे माध-परंतु काल दोन चांगल्या गृहस्थांनी सुचवल्यावरून महाराजांनी एलिप्त साहेब बहादुर, रोव्हिन्यू कमिशनर उत्तर प्रांत, यांचे हुज़र एक इंग्रेजीत अर्ज लिहून लागलीच रवाना केला; त्यांतील आशय हाच की "माझ्या मनास तशीच काही उद्विग्नता प्राप्त झाल्यामुळे, मी जिल्हयास राजिनामा देऊन चुकलो. परंतु आपण प्रापंचिक, तेव्हा आपल्या हातून ही गोष्ट बरोबर घडली नाही, असे मागाहून विचारा अंती ध्यानात येऊन, खेद वाटत आहे. आतां जिल्हयाकडून सदई राजिनाम्याचे प्रकर्ण, आपल्या कडे येईलच, परंतु या संबंधाने हुजुरास माझी खरी स्थिती जाहिर