पान:देवमामलेदार.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. गोविं०-आज कांहीं फार नाही. अगदी थोडी. चार रुपयांच्या पावल्या एकादशणीकडे सात रुपयांच्या चवल्या, पावल्या इतर वैदिक भिक्षुकांकडे बारा रुपयांचा खर्दा दक्षणा, शिवाय बैरागी लोकांना मीच तुम्ही देऊन ठेवलेल्या ह्या दक्षणेच्या पैशांतून गांजा तमाखु करतां खा वाटला तोच आज जास्त झाला, साडेसाहा रुपयांचा जवळ जवळ लागला तो. भारी गांजा पिणारे जबरे लोक ! गांजाला द्या ह्मणन धडधडीत मागतात. हरि-आहो या व्यसनी लोकांना कवडी सुद्धा देऊ नये जे आहेत्ते. पुरा०-(एकिकडे ) जे आहेत्ते यांना मात्र द्या. माधo-बरें आहे, या प्रमाणे मी मांडतो माझ्या किदीत, आजच्या नांवच्या वाजचा बराच मोठा आकडा आहे. (वाचित) कापड चोपड नुसते पन्नास रुपयांचे. पण तें उघार खात्यांत आहे ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ, आटा, ही पण आजची उधारीच आहे. हे तेवीस ( मोजीत असलेसे करून ) तेवीस-तेवीस, आणि ते आठ रुपये लाकडांच्या गंडोर्याला, बैरागी लोकां करता दिले ते आणि हे आत्ताचे, करूं तो आता हिशेब मग. एकंदर किरकोळ सुद्धा. बरें तें असो गोविंद भडजी, उद्यांची मिसल लाउंद्या. उद्या तुम्ही पूजा करायची. आणि फक्त तुमचीच तेवढी एकादशणी, महाराज घोघोहून येत तो पर्यंत. हरि०-(पुराणिकास हळच ) उद्या घोघोस जाण्याचा बेत झाला आहे महाराजांचा. जे आहेत्ते आपल्याला सकाळी गाशा गुंडाळावा लागणार ! पुरा०-जे आहेत्ते शेवटला पुख्खा उद्या महाराजांबरोबर झोडून, निघणार आपण. (उघड माधवरावास) महाराजावर काही संकट आले असावेसे वाटते ! माधव-होय. गांव आहे तेथे शास्त्री बोवा, माहारवाडा आहेच, काही दुष्ट लोकानी महाराजां विरुद्ध, सरकारांत अर्ज केले की, " देव भक्तीत, आल्या गेल्या ब्राह्मण वगैरे याचक समुदायास