पान:देवमामलेदार.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. आत्माको जला दिया. तुमारा घरदार और सब सता नाश हो जायगा. ( महाराजांच्या अंगावर धावतो.) महा०-( त्याचा हात धरून ) माफ करो साघो, आप बहोत भुखी है, आपको बहोत तकलीफ हुई चलो महाराजजी, भोजन तयार है, स्नान करके निरं०-(रागाने ओरडून ) अरे अस्नान नहिं करते हम. ( महाराज त्याचा हात धरून त्यास घेउन जातात.) प्रवेश दुसरा समाप्त. प्रवेश ३ रा. (स्थल-एरंडोल, महाराजांच्या बि-हाडाची ओसरी. दोन आश्रित म्हणजे हरिदास व पुराणीक बोलत आहेत असा पडदा उघडतो.।) हरिदास-किती लोक दुष्ट असतात या जगांत जे आहे ते. अशा पुण्य पुरुषाच्या विरुद्ध खटपट करण्याची यांना बुद्धि तरि कशी होते ? देव यांना बुद्धि अशी देतोच कशी याचे मला मोठे नवल वाटते. अशा पुरुषाला संकटांत पाहून कोणाला बरे बरे वाटेल? पुराणिक-काही का असेना ! ( हंसत ) तुमचे ग्रह फार सुरेख आले आहेत. हल्ली अकरावा गुरु असावा बहुतेक आपल्याला! रात्री जरा कधी " आ-ऊ" केले किं, झाले. आपलें तर यथास्थित चालले आहेना ? त्यांच्यावर संकट आले तरि जे आहेत्ते आपल्या तरतुदीत काही कमी होते आहे कां ! अहो जे आहेत्ते सूर्याला राहुनें थोडेसे ग्रासले म्हणून काय झाले ? तेवढ्याने त्याला कमीपणा येत नाही आणि लोकांना जेआहेत्ते मिळणाऱ्या प्रका. शांतहि त्या योगाने कमीपणा येत नाही. हरि-(मनांत ) किती ढोंगी आहे हा मनुष्य ! केळी चे पान लागत जेवायला रोज ! घरी याच्या काकोबाने ठेवले असतील, एवढे याचे थाटमाट! किती निर्लज्ज ! दुसऱ्याचे मर्म भदायला जे