पान:देवमामलेदार.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. १०७ मोहन०-अहाहा, तेवढेच शब्द कानांला या गोड लागतात. ( मंडळीस ) बरें आलात तुम्ही तुम्हांला एक विचारतो, तेवढे सांगा-अगदी खरे असेल तेच सांगा. कोणाची भाडबिड ठेऊनका. हा अशुद्ध देह, ज्याने महाराजांचे दर्शन ते जिवंत असतां गर्वाने घेतलें नाहीं तो देह जिवंत ठेवण्यास योग्य आहे काय? सांगा. सांगा. नाही म्हणून सांगाला भिऊ नका. तुम्ही सभ्य आहात. महाराजाचे खरे भक्त आहात. मी हा तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो ( तसेंकरून) तुम्ही खरे सांगितल्या शिवाय मी उठायचाच नाहीं. सर्व०-(त्यास उठवून ) वस्तादजी, आपण अगदी खेद करूं नका. आपल्याला आम्ही खरोखर सांगतों, आपला पश्चात्तापाने देह शुद्ध झालेला आहे. तरि आपण मनांत आणलेला अविचार सोडून द्या. आणि महारांजाच्या स्मारका संबंधाने पुढे काय करावयाचें, या संबंधाने मंडळी विचार करायला चालली आहे तर तिकडे चला. (त्यास घेऊन जातात.) अंक साहावा समाप्त. प्र संपूर्णमस्तु.