पान:देवमामलेदार.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. टाकाव्या ! हा जिवंत ठेवण्याला योग्य नाही. अशुद्ध, अशुद्ध देह, किळस येतो आतां याचा मला. बळवंतराव, तूं माझा खरा मित्र आहेस ना? सर्व०-(एकिकडे ) अरे, अरे, अरे. याला आता याची कृति खात आहे. विचारा आतां काय विचारतो आहे मित्राला ? बळ०-हे तुला आणि यशवंतराय महाराजांना ठाऊक. माहन०-तर मग एक माझें काम करशील? बळ०-अरे हे काय विचारायला पाहिजे? माझ्या आटोक्यातले असलेंमोहन०-अरे बाबा, तुझ्या अगदी अटोक्यांतलेच आहे. बळ०-कोणते? मोहन०-केले मात्र पाहिजेस है. न करशिल तर माझा तूं खरा मित्र नाहीस असें मी समजेन. सर्व-हा काय सांगणार आपल्या मित्राला आतां कोण जाणे ! बळवं०-अरे हा मी तयार आहे सांग. तुला ह्या वेळेस संतोष व्हावा एवढया करतां मोहन०-( मध्येच ) अरे म्हणनच मला संतोषविण्याकरता जा आत्तांच्या आत्ता तालमीत. आणि सर्वात जो मोठा मुद्गल आहे तो घेऊन ये जा. मी हा असा या पादुकांवर पडतो. आणि खरा मित्र असलास तर त्याने माझा कपाळ मोक्षकर. जा जा. आता एक क्षण सुद्धा थांबू नकोस. ( त्याला ढकलतो.) सर्व-विचाऱ्याला जीव नकोसा झाला आहे. चला आपण जाऊन त्याचे समाधान करूया. बळ०-मी जातो मित्रा. पण एकच प्रश्न तुला विचारण्याची मला परवानगी दे. तं महाराजांचा खरा शिष्य आहेस काय? जर असलास तर त्यांच्या प्रमाणे तुला शांती ठेवायला शिकले पाहिजे. अरे आत्महत्या करणारावर ते कधी तरि संतष्ट होतील काय. याचा विचार करून मग काय करायचे ते कर. (सर्व येतात.) सव-('यशवंतराय महाराज की जय' गर्जना होते.)