पान:देवमामलेदार.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मठे-(पाहून ) अहो, इकडे पहा. हा महाराज जिवंत असतां त्यांस तुच्छ मानणारा मोहन मास्तर त्यांच्या पादुकांवर मस्तक ठेऊन अश्रु ढाळित आहे. आणि हा त्याच्या शेजारी उभा असलेला त्याचा मित्र बळवंतराव चापेकर वाटते? हडप०-काय हो या वेळेस ही गंगानदी सुनाट दिसतें ! जीत परवां हजारो दंपत्ये, महाराजांच्या चरण ओघाखाली, अवभृत स्नानातुल्य न्हायली, तिने सुद्धा आता पुन्हां असा प्रसंग आपल्याला कसचा लाभणार, असेंच मनांत आणून किं काय उदासिनता धारण केली आहे. मुठे-अरेरे, ही देवळे, आणि हे पटांगण यानीही आज उदास वृत्तिच धारण केली आहे. ( पाहून ) अरेरे, पण इकडे या तालिमबाज मोहन मास्तरची पहा काय अवस्था झाली ती. पूर्ण पश्चात्ताप झाल्या सारखा दिसतो विचाऱ्याला. हा बळवंतराव चापेकर, त्याला 'शोक आवर' ह्मणून उपदेश करित आहे. पण तो जास्तच स्फुदत आहे. [ मोहन मास्तर महाराजांच्या पादुकाांवर मस्तक ठेवलेला, आणि बळवंतराव त्यास उपदेश करीत आहे असा पडदा उघडतो.] वळ०-मित्रा, तुला पूर्ण पश्चात्ताप झालेला आहे, आतां शोक आवर. 'पश्चात्तापेन शुध्यते' त्या प्रमाणे तुझी शुद्धि झाली. नुसता शोक करून काय होणार ? तूं त्यांच्या चरणांवर हात ठेऊन, प्रतिज्ञा केलीच आहेस, किं आज पासून, नाच, तमाशा वैगरेकडे मुळी पैसा खर्च करणार नाही. होईल तितका सत्कार्याकडे व महाराजांच्या स्मारकाकडे खर्चिन अशी, तर त्या प्रमाणे वागलास म्हणजे त्यांत सर्व आले. या पेक्षां उत्कृष्ट प्रतिज्ञा आणखी कोणती? मोहन०-( स्फुदत उठून ) मित्रा त, म्हणतोस तें सर्व खरें, पण हा गहीवर माझ्याने दाबवत नाहीरे ! (दुःखाक्रोशानें ) केवढा चाडाळ मी! महाराजांचे जिवंत असतां दर्शन घेण्याची या अधमाला कशी वासना झाली नाहीं ! हा पापी देह, ह्याचा मित्रा असा संताप येतो, कि ह्याच्या चिंधडयान् चिंधड्या उडवून