पान:देवमामलेदार.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ देवमामलेदार. वरून 'यशवंतराय महाराज की जय' म्हणे. दुसरा शब्दच लोकाना त्या दिवशी माहित नव्हता. पोलिस लोकांच्या बंदोबस्ताला सुद्धा त्या दिवशी कोणी जुमानले नाही. जोग०-महाराजांना पुष्पालंकृत करून उचललेमात्र, आणि 'यशवंतराव महाराज की जय' हा गहिवराचा शब्द होऊन सर्व रविवार पेठ दणाणून गेली ती आठवते का ? वाड-महाराजांची आतां शेवटली सेवा आपल्या हातन थोडी तरी घडावी ह्मणून जो तो किती तत्पर होता त्या वेळेस ! तितक्यांतले तितक्यांत त्या सेजा बाईने एक मखर तयार करून आणले. मिळन महाराजांच्या योग्यते प्रमाणे त्यांचा अंत्यविधी व्हावा ही सर्वत्रांची इच्छा. त्या दिवशी जात, धर्म सर्व विसरून गेले होते. मुसलमान, पारशी, हिंदु सर्वांचा धर्म जणू काय महाराजांचें चरण ! त्यांच्या चरणभेटीची लोकांना अतिशय गोडी. जोग-प्रेत संस्कार लोक अशुभ समजतात. कोणी पहायला सुद्धा धजत नाही तिकडे. पण या वेळेस सर्वच उलटे. जो तो महाराजाचे चरण आता पुन्हां दृष्टिस पडायचे नाहीत. ह्मणून मोठ्या तातडिनें अगोदर महाराजांचे चरणांकडे धाव घेत सुटला. (पाहून) ही आलीच मंडळी घ्या ठरल्या बेता प्रमाणे आपल्याला मिळायला. चला त्या दिवशीच्या खडकावर जाऊन मला नेहमी बसावेसे वाटते. खरा प्रेमा आणि भक्ति उत्पन्न करणारा असा तोच खडक आहे. तेथे बसून पुढे महाराजाचें स्मारक कसे काय करायचे ते ठरवू. (बिवलकर, हडपसरकर, मुठे, चांदवडकर, परभुणे इ. येतात.) बिव०-( पुढे येऊन ) कसे काय वाड, चला जोगळेकर ( हातात हात घालतात.) काय हो हाच रस्ता परवां कसा गजबजन गेला होता. रीघ नव्हती माणसाला. तशांत पेढा बर्फीची वृष्टि आणि त्यांतच सराफ लोकांनी उधळलेल्या खुर्याची वृष्टि. त्या दिवशी तर उदास वाटतच होते, पण आतांची ही उदासिनता जास्त भासते का चांदवडकर चांदव-अहो प्राण गेल्यावर कुडीची अवस्था काय पुसायची? तशीच या जनस्थानची अवस्था झाली आहे.