पान:देवमामलेदार.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ देवमामलेदार. (धूम्रमुख व त्रिपुर येतात पाया पडतात, एका बाजुला होतात, मागील पडदा पडतो.) धूम्रमुख-इतकी महाराजांची एकदम कशाने बुवा प्रकृति बिघडली? त्रिपूर-त्याचे कारण तुला सगळे सांगतों ऐक. महाराज पुण्याहुन मदन श्रीकृष्णजीचे येथून जोगळेकरांबरोबर त्र्यंबकास आले धूम्र-जोगळेकर हे कोण ? त्रिपूर-जोगळेकर त्र्यंबक संस्थानचे कारभारी आहेत. तेथे महाराज एके दिवशी प्रदक्षणा घालित असतां भिंतीला म्हणून पाठ टेकायला गेले तो ती फळ्या लावून घेतलेली खिडकी होती धूम्र० ते मला कळले आहे. त्या खिडकिंतून ते खाला चौकांत पडले, पण त्याच्यावर त्यांची प्रकृति चांगली सुधारली होती म्हणतात त्रिपुर-काय असेल तें असो ते गेल्या चैत्रापासूनच. आपल्या निजधामास जाण्यासंबंधी बोलत आहेत. धूम्र० -अगदी स्पष्ट ? निपूर०-स्पष्ट नव्हे. परंतु त्यांच्या येथे आज पंचवीस वर्ष सारखा त्यांच्या जवळ असलेला त्यांचा कारकन माधवराव १२० पांडे म्हणून आहे, तो चैत्रमासी म्हणाला की, मी आपल्या वत नाच्या गांवी जाउन येतो, तेव्हां महाराज म्हणाले "माधवराव इतके दिवस तुम्ही मजजवळ असतां आतां महिन्यासाठी कशाला दूर होता ? आणि परवां तर त्यांनी आपल्या दोन्ही भावांस आप पुतण्या कडून लवकर येण्याबद्दल पत्रे लिहीली आहेत. धूम्र०-ऐका. विष्णसहस्रनामाचे पाठ आतां जोराने चालू झाले आहेत. चला आपणहि महाराजांची काही शेवटचा स आपल्या (जातात.) पहिला प्रवेश समाप्त.