पान:देवमामलेदार.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. पहि-अहो थांबा ही चोखा मेळ्याची जोडपी नाचताहेत ही पाहून मग पुढे जाऊं. दुस-मला हे पाहवें, का ते पाहवें, असें झालें आहे ! तो पहा तिकडून टिंगरीचा सूर कानांत घुसला. हे कबीर पंथी लोक असतात जातीचे मुसलमान, पण यांना आपल्या देवाचें भजन करतांना पाहून आश्चर्यानंद होतो. हे पहा गुरबाळ संतोष, पांगुळ आणि वासुदेव; एकच गोंधळ आहे बुवा ! हा मिश्र आवाज कसा काय लागतो कानाला? पाह-हे मिश्रण तर कर्ण रोग हरण करील. (मध्येच) हाय हाय ! पण हा दीन स्वर मात्र आपल्याच्याने ऐकवत नाही बुवा ! हृदय द्रवलें! दुस-ही आंधळ्याची माळका आली वाटते ! होय तीच ही ! ( आंधळ्याची माळका 'देवदाता' ह्मणत येते. त्यांस हे पैसा पैसा देतात. ते ' देव तुम्हाला बरकत देईल' असें म्हणुन 'यशवंतराव महाराजकी जय ' म्हणतात). दोन्हीगृहस्थ-( यशवंतराव महाराजकी जय ह्मणून ) जिकडे तिकडे हल्ली “ यशवंतराव महाराजकी जय " चालला आहे. पहि-ह्या पहा याचकांच्या झुंडी संतुष्ट होऊन चालल्या आहेत, तर कोणी संतुष्ट होण्या करतां जात आहेत ! सगळ्यांचा माय बापच आहे जसा या गावांत ! जो तो मोठ्या उत्सुकतेने भेटायला चालला आहे. सर्वात हरिदास लोकांची बरी पंढरी पिकली आहे ! दुस-ते घोड्यावरून बसून येत असलेले गृहस्थ, बहुतकरून हरिदास असावेत. गांवांत किती तरी हरिदास जमला आहे, पण तितक्यांचा परामर्ष महाराज घेत आहेत ! जगत्कुटुंबी खरा ! पाहि-अहो नुसते हरिदासच काय, पण तुम्हीच पाहताना, गवई, बजवई, नाटकवाले, तमासगीर, जसें एकादें राजधानीचें शहर बनन गेलें आहे, अहाहा ! इतकें दातृत्व राजाच्या ठिकाणी सुद्धा नसेल. अंमळनेर पंढरीतला पंढरिनाथच हा!" दुस-एका महाराजांच्या सहवासाने सर्व गांव भाविक झाले.