पान:देवमामलेदार.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार गोंधळांत धालिल पहा बुवा ! आपल्या चित्तवृत्ति तर गोंधळून गेल्या अगदी. ब्रह्मानंद असाच असेल का हो ? दुस-छे, ब्रह्मानंदाची इच्छाच करित नाही आपण. कारण तो या पेक्षा कमीच असला पाहिजे. (कान दिल्या सारखें करून) ऐका हा डमरू ! चला जरा पुढे ! आपण असेच गांव भटकत राहणार दिवसभर ! पहि०-या डिडिम डिडिम नादाने कर्णाला किती आनंद होत आहे ! हा डमरु वाजवणारा प्रत्यक्ष शिवच असला पाहिजे. दुस-कसा काय हा शंख वाजवला या जंगमाने ? ब्रह्मरंध्र याने माझें मोकळं केलें ! पहि-आनंद सांठवा त्यांत, त्यापासून उप्तन्न झालेला. ऐका, आता तंबुरी सुरू केली या गुलामाने ! कशी लावतो आहे पहा ! प्रत्येक रोमन् रोम माझा ताठ व्हायला लागला ! ही कला हा कोठे शिकला एवढी दुस-अहो, ज्याच्या अंत:करणांत यशवंताचे यश प्रविष्ट झाले, त्याच्या पुढे सर्व कला हात जोडून दासी सारख्या उभ्या असतात ! पहा किती मंजळ घंटारव याने सूरू केला! माझा प्रत्येक स्नायू हर्षाने या नादासरसा उडावयास लागला ! पहि०-गुलाम गवया सारखा, प्रथम 'आ आ आ करून गायला लागला तो. कसलें बरें पद हा ह्मणत आहे? दुस-(कान दिलासे करून ) काय ? "भवतारक नाम तयाचें गाऊं” वाः किती सुरेख गोड गायलेंन हे यानें ! पहि-लोकांना मौजच्या मौज भासवुन, उपदेश करणारी ही तन्हे त-हेची मंडळी, या गांवांत आली आहेत काहो ? पहा, इकडे वाघ्या मुरळीने सर्व लोकांना गर्क करून टाकले आहे ! धन्य आहे हा गांव! दुस-अहो, आपल्या या गांवाचे भाग्य उदयाला आले आहे. अहाहा ! धन्य धन्य ती माउली, की जिच्या पोटी हा यशवंत 'गुंडा ' जन्मला ! आणि धन्य आह्मी या गांवचे लोक !