पान:देवमामलेदार.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार। पहा किती मन लावून हे लोक रांगोळ्या काढताहेत ! काही पाण्याने रस्ते भिजवीत चालले आहेत. किती शीतल हे पालवीचे मंडप ! प्रत्यक्ष राजाकरता सुद्धा लोक इतकी मेहनत घेणार नाहीत ! मन अगदी गार झालें ! पण ह्या सर्व आनंदात लवकरच व्यत्यय येणार, कारण महाराजांची एरंडोलास बदली झाली. पहि०-ही झुंड कसली येत आहे इकडून ? (इतक्यांत 'यशवंतराव महाराजकी जय' असा गजर होतो तिसरा गृइस्थ पुढे येतो तो गुळ शेरणी वाटतो.) दोन्हीं-कशाबद्दल ही महाराज ? तिस-तुम्ही आपले तोंड गोड करा. तसेच आमचे काही काम घडून आले त्याबदलचे आहे हे. बोला यशववंतराव महाराजकी जय (एकच गजर होतो मंडळीची झुंड येते.) ही आलीच वाटते महाराजांची स्वारी. देवदर्शनाला चालली आहे. चला आपणही यांच्या बरोबरच देवदर्शनास जावें ( सर्व जातात व पुन्हां येतात. देवळाचा देखावा, जत्रेसारखा झणजे फूलमाळी 'फुले, हार, गजरे तुलसी घ्या' म्हणतात. तसेंच मेवा मिठाइची दुकानें, गुलाल, बुक्का वगरेची दुकानें व फेरीवाले, दृष्टीस पडतात. ' यशवंतराव महाराजकी जय असा मधून गजर होतो. याचक जनांच्या आरोळया ' अरे गरिबाला दे रे मायबाप ' अशा होतात. महाराज देवालयांत दोन तीन बड्या व इतर मंडळीसह प्रवेश करतात, देवा जवळ पुजारी उभा आहे, बाहेर महाराजांच्या दोन्ही बाजला ब्राह्मण गिनें उभे राहून ईश्वर प्रार्थना म्हणत आहेत ती संपल्यावर महाराज जावयास निघतात, काही भाविक पाया पडतात, गुळाच्या शेरण्यांचे नवस फेडतात. महाराज ' सर्वत्रांना प्रसाद द्या ' असें सांगतात, कोणी द्रव्य देतात, त्यास 'गुरीब गरीबांना द्या' धर्माकडे लावा ' असें महाराज सांगतात, याचकांस 'ध्या बरें ' म्हणून पैसे देतात, कोणी पाया पडून माझा मनोदय कशाने सिद्ध होईल म्हणून विचारतात, त्यांस कोणास एकादशणी करा, कोणास सांजवात लावा, स्त्रियांस-मारुतीस प्रदक्षिणा घाला म्हणून सांगतात. o