पान:देवमामलेदार.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. अंक ६ वा. NaN प्रवेश १ ला. ( स्थळ-नासिक रस्ता. पात्रे-त्रिपूर आणि धूम्रमुख येतात.) त्रिपूर-को कोणिकडे निघालात ? धूम्र०-दुसरे कोणीकडे, हल्ली सर्व जनस्थानवासी लोक जिकडे जातात तिकडेच. त्रिपूर-म्हणजे, महाराजांच्या दर्शनाला किं काय ? धूम्र०-होय, महराजांची प्रकृति पुष्कळ नादुरुस्त आहे म्हणतात. त्रिपूर-तर तुमचें व आमचे जाण्याचे ठिकाण जुळलेच म्हणायचे. धूम्र०-अहो, तुमचे आमचेसे काय पण ह्या रस्यांतून जाणाया बहुतेक लोकांचे तसेच जुळणार आहे. त्या महात्म्याच्या दर्शना करितां ह्या पहा झुंडीच्या झुडी चालल्या आहेत, त्रिपूर०-(पाहून) हेच त्यांचे घर ना हो? - धूम्र०-होय हेच. ते पहा. पुष्कळ ब्राह्मण याचक तृप्त होत्सात पळी पंचपात्री खणखण वाजवित ज्या दारांतून बाहेर पडत आहे त तेंच घर. बाहेरून दर्शनाला जाणाऱ्यांची आणि त्यांची एकच गर्दी झाली आहे. चला, आपणहि आंत शिरूया. ( जातात.) (नंतर महाराज पलंगावर निजले आहेत, जवळ वाड व जाग ळकर बसले आहेत, हरीबाई बळीरामदादा व नारायणराव र ब्राह्मण विष्णुसहस्रनामाचा पाठ मणत आहेत, लोक दर्शन घत आहेत असा पडदा उघडतो.) वाड०-( दर्शन घेणाऱ्या मंडळीस ) महाराजांची आज फारच प्रकृति बिघडली आहे. तरि दरून दर्शन घेण्याची आज व्यवस्था ठेवली आहे. कृपा करून मंडळीने दुरून दर्शन घ्यावं. महा-( हात वर करून अडखळत ) येऊ द्या बर, स पहिल्या सारखें आंत येऊं द्या. कोणाला मनाई करूं नका.