पान:देवमामलेदार.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. महा०-बाई, मी यःकश्चित मनुष्य. परमेश्वराची आणि माझी बरोबरी कशी होईल? बाई, प्राणीमात्राला उत्पन्न करणारा तो आहे. लय करणाराहि तोच. त्याच्या इच्छे बाहेर आपणा मनुष्याच्याने काय होणार ? तो ठेवील त्या स्थितीत आनंद मानून राहणे, म्हणजेच त्याची आज्ञा पाळणे आणि तसे न करणे म्हणजे ते त्याची आज्ञा भंग करण्या सारखे आहे. मदन-मरण कधी येईल, हाच हव्यास नेहमी धरला म्हणजे त्याच काळजीने मनुष्य जास्त अजारी होतो. तसे करणे म्हणजे ईश्वराची आज्ञा मोडणें आहे समजलीस महाराजांचें तरि ऐक आता. ( महाराजांस ) नेहमीं हिचे हे विचार चालतात त्या मुळे प्रकृति जास्त बिघडते. मुक्ता-महाराजांच्या मुखातून शेवटी थोडासा उपदेश ऐकावा अशी इच्छा आहे. महा-बाई, आपण सुज्ञ आहो. मी काय आपल्याला उपदेश करावा ? माझी काय उपदेश करण्याची योग्यता आहे ? मी काही विद्वान नाही, किं धर्म गुरु नाही. त्यांनी तर स्त्रियांना पतीच्या सेवे. सारखें दुसरे काही नाही, असे सांगितले आहे. वेलींना झाडा शिवाय जशी उच्च गति दुष्प्राप्य, तशी स्त्रियानांहि पति शिवाय उच्च गति दुष्प्राप्य आहे. तेव्हां पतीची सेवा हेच स्त्रियांचे मुख्य व्रत. पुरषानीहि स्त्रियांना त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला देणे त्यांचे कर्तव्य आहे. संसारांत आणि परमार्थात जेव्हा जेव्हां अडचणी उद्भवतात, तेव्हां तेव्हां पुरषांचे मन रंजविण्याचे काम स्त्रियांचे आहे. आणि श्री नरहारचे चिंतन करित त्या अडचणी दूर करण्याचे काम पुरषांचें आहे. ( आंतून एकजण येतो व 'बाईचे पथ्याचे आणि चहा तयार आहे' असे सांगतो.) मदन-पथ्याचें बाईना म्हणावें इकडेच घेऊन या. (महाराजांस ) चहा घ्यायाला चलावें. (जातात.) अंक पांचवा समाप्त.