पान:देवमामलेदार.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ देवमामलेदार. पाहिजे. किती तरि विघ्नं आहेत. कसला माझा हेतू पूर्ण होतो ? मी अशीच मरणार ! (थांबून ) अग बाई, पण मी अशी निराश का होते? इकडून कोणी गेलं आहे, ते आणल्या शिवाय राहतील का महाराजांना ? आणि महाराज तरि सर्व हकिगत ऐकल्यावर आल्या. शिवाय राहतील का ? भक्तांचा कनवाळू तो विष्णूचा अवतारच आहे. आतांच जरा डुलकी लागली होती. इतक्यांत महाराज आलेले पाहिले. पण ते स्वप्नांत. महाराजा, तुमचीच प्रार्थना करते, या, आणि एकदा या आपल्या दीन दासिला दर्शन द्या. ( पाहून ) या पहा, राधा आन गोपिका घोरत पडल्या आहेत. विचाऱ्यांना माझ्या मुळं रात्रिच्या रात्री झोपेशिवाय काढाव्या लागतात (चाहूल ऐकलेसें करून ) कुणी आलं वाटतं ? ( मदन श्रीकृष्ण व महाराज येतात.) मुक्ता-(हर्षानें ) अगबाई, आपणच का ? आणि महाराज पण आले ? परवां येईन म्हणन म्हणायचं ते इतक्या लवकर मदन०-सर्व सांगतो तुला. स्वस्थ पडून रहा तूं. ( तिला निजबतो. महाराजांस बसण्यास खर्ची देतो, महाराज बसतात.) महा०-बाई, आपण स्वस्थ असावें. आपल्या इच्छेप्रमाणे मी आलो आहे बरं. प्रकृति अस्वस्थ होईल, असे काही करू नका. श्रीनरहरिचे चिंतन करित स्वस्थ पडा, मुक्ता०-महाराज, माझ्यानं फार बोलवत नाहीं, चालवत नाही, शक्तिच नाही राहिली आता माझ्या अंगांत ! पण एकदा तशीच उठन आपल्या चरणांवर लोटांगण घालण्याची, या तुमच्या दीन मुलीची इच्छा आहे हो. तेवढी पूर्ण करा. मला आई नाही बाप नाही. पण त्यांच्यापेक्षा सुद्धा आपण मला जास्त वाटतां. ( उठते, मदन श्रीकृष्ण तिचा हात धरून महाराजांच्या पायावर घालतात.) महा-(त्यांस उठवून) बाई, श्रीनरहरिचरणी एकनिष्ट भाव ठेवा. सर्व कामना सफल होतील.(मुक्ताबाईस मदन पुन्हां निजवतो.) सक्ता-आता माझी कांहीं कामना राहिली नाही. इतकीच कामना होती. आता मी सुखानं मरेन. पण इतकं माझं नशीब कुठे आहे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घेत असतां मरण येयाचं?