पान:देवमामलेदार.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. प्रवेश ६ वा. (स्थळ-पुणे, मदन श्रीकृष्णाचें घर, मदन श्रीकृष्णाची पत्नी , मुक्ताबाई दुखण्याने पडली आहे असे दिसते.) मुक्ताबाई-( कण्हत ) आतां कांही मी या दुखण्यांतून वाचत नाही. सारखी औषधे चालली आहेत. मेले थोडे का उपाय केले? पण ज्याचं नांव तें, गुण म्हणून नाहीच. दिवसोंदिवस जास्तीच दुखणं आपलं. देवा सोडव आर्ता या हालांतून लवकर. कंटाळा आला या जगाचा. कसला हेत राहिला नाही. महाराजांचें दर्शन घेता घेतां हे प्राण सोडावे एवढा काय तो हेतु राहिला आहे. तेवढा पूर्ण कर म्हणजे गंगेस घोडे नाहले माझे ! राम, राम, राम. या राम पहाऱ्यांत देवा, तुझें नांव येऊ दे. ( थांबून) सकाळ झाली, कि आपली ही पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. ही ऐकून मला किती आनंद वाटावा : पण मेली तीच आता कटकट वाटते. सहन होत नाही. बिघडला मेंदू. देवा, तू उत्पन्न केलेल्या, या आनंदि प्राण्यांची जिला कटकट होते, अशा या दुष्टेला जिवंत तरी कशाला ठेवलीस? या वेळेला वारा कसा गार सुटतो, जरा जाऊन बसेन म्हटलं वायांत तर-लागलीच घर्रातली माणसं कोल्हे कुई करतील. पण त्यांना तरि काय दोष लावतें मी? ते का माझ्या आहिताचं सांगतात ? काय बाई, कोणाकड दोष नाहीं. माझ्या कर्माचा हा सगळा दोष आहे. हेच जर माझें कर्म धड असते तर गुण नसता आला ? माझ्या दुखण्यापासून तिकडे विश्रांती कशी ती मुळीच माहित नाही. आता माझी आशा सोडा, आणि इतकी जिवाची आटाट करून घेऊ नका, दुखण्यांत पडाल, म्हणून कितीदां सांगितले. पण ऐकायचेच नाही. उलट म्हणायचं, तुझ्या बरोबर अजारी पडायचं माझं भाग्य कुठे आहे ? ( रडत ) देवा, जन्मोजन्मी मला हेच पति मिळू देत. आतां महाराजांच्या चरणावर हा देह ठेवावा, एवढा हेतू आहरे नारायणा. काल इकडून जाणं झालंच आहे इंदूरास महाराजांना आणण्या करता. पण महाराज कसले येतात ! इंदूर म्हणजे किती लांब. इंदूरच्या राजानं त्यांना सोडलं