पान:देवमामलेदार.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. होते. त्यांच्या मनांत महाराजांचे दर्शनाची अत्युत्कट इच्छा होतीम्हणन त्यांनी महाराजास एक कलकत्याहून पत्र लिहीलें, किंमला आपण खांडवेमुक्कामी येऊन दर्शन देण्याची मेहेरबानी करावी. मदन श्रीकृष्ण-पण इंदूरच्या महाराजांनी त्यांना कसे सोडले ? याचे मला मोठे नवल वाटते. माधव०-नवल कसलें त्यांत. त्यांना भेटन लवकर परत येतो असे सांगून महाराज निघाले तेथून. तरि थोरल्या राणीसाहेब, मा साहेब म्हणतात त्यांना, त्या नवत्याच सोडित महाराजाना. बिचारीची महाराजांवर भक्ति अतोनात. 'मदन०-(धांदलिने) मग ते परत जायचे असतील इंदुरास? तुम्ही त्यांच्याच बरोबर आला आहा वाटते? माधव०-होय. मी त्यांचा कारकून आहे. माझें नांव माधवराव. आपल्याला मी पाहिलेले आहे, पुण्याला असताना त्यांचा विचार परत यायचा दिसत नाही. मदन०-हे? तर आता तुमच्या जवळ, बोलायला हरकत नाही. मी महाराजानांच घेऊन जायला आलो होतो. अर्थात् महाराज इथे आहेत ही बातमी मला नव्हती. म्हणून मी इंदुरास जाणार होतो. काय सत्पुरुषांची अगाध लीला आहे पहा. इथे महाराज आले आहेत, हे ऐकून मला किती आनंद झाला आहे,तो शब्दांनी व्यक्त करता येण्या सारखा नाही. अहो, आमचे कुटुंब आहे, अत्यावस्थ. तिची फार इच्छा आहे, की एकदा अशा वेळी महारांजाचे दर्शन घ्यावे. महाराज गेले आहेत कोठे ? माधव-काळुला घेऊन ते तुम्ही येण्याच्या किंचीत आधी विठ्ठलमंदिरांत गेले आहेत. हा मीहि तिकडेच निघालों आहे. मदन-चला तर मीहि तुमच्या बरोबरच येतो. किंवा तुझी इथेच असा. मी त्यांना इकडे घेऊन येतो. नाही तर चला, दोघेहि जाऊं, आणि घेऊन येऊ त्यांना. ह्मणजे लागलीच या आत्तांच्या गाडीने पुण्यास जाण्याला ठीक पडेल. (जातात) ( प्रवेश पांचवा समाप्त.)