पान:देवमामलेदार.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. चें म्हणजे. ती पण नाही. वाकी' राजा बोलेनी दळ हालें' राजा आहे तो, तेव्हां अडायचं नाहीं कांही म्हणा. पण देव बरोबर नेले नाहीत. आणि त्यांची पुजा केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही हा नेम आहे. म्हणून वाटत. देव तिकडं जात तो पर्यंत उपास पडणार ! बाकी देव घेऊन मागच्या गाडीनं ब्राह्मण गेलाच आहे. तेव्हां तितकी काळजी नको. शिवाय त्या राजाची इकडच्यावर भक्ति तर फारच आहे. इकडची आज्ञा म्हणजे अगदी शिरसावंद्य पहिल्या भेटीलाच त्यानं केवढे उची उंची पोषाख इकडं नजर केले. मलाहि लुगडं चोळी म्हणून, चांगला दहा हजारांचा विषय दिला. पण इकडं शिवायचं सुद्धा नाही त्याला. ते सगळे परत करून, शिवाय त्या राज्याच्या दोन मुलांना आणि दोन्ही राण्यांना भरगच्ची पोशाख द्यायचे झाले इकडून. आपलं दैन्य म्हणून कधी कोणाला दाखवायचं नाही. हा मोट्ठा स्वभाव. पण मी म्हणतें दसऱ्या पुढे नको, पण मेलं राजापुढे दाखवायला काय हरकत आहे. पण स्वभाव, त्याला काही औषध आहे? स्वतःस दोष लावित ) पण स्वभाव तसा असला, म्हणून मेलं वाईट काय झालं त्यांत? देव काही कमी पाडित आहे का? उलट अशा स्वभावानं अधिक अधिकच देतो. ( आंतून सुंदरा बाई अशी हाक येते। कोण ? आले हो गिरजाबाई, चला जाऊं द्या बाई. उद्यांच्या जाण्याच्या तयारिला लागलं पाहिजे. ( जाताना) बाहेर गाँवाला जा म्हणजे माझं मन असं उदास का बरं होतं ? चवथा प्रवेश समाप्त. प्रवेश ५ वा (स्थळ-मनमाड. पात्रे-मदन श्रीकृष्ण, आणि माधवराव.) माघ०-ही बातमी तुम्हांला समजलीच नाही वाटतें ? महाराज आतांच येथे आले. म्हणजे हे कसे ते फोडून सांगतो. कलकत्यास प्रदर्शना निमीत्त निजाम सरकारची स्वारी व्हाईसरायच्या मुलाखतसि गेली होती, त्याज बरोबर त्यांचे दिवाण नरेंद्र बहादर