पान:देवमामलेदार.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ देवमामलेदार. तुको-एकेक गोष्ट ऐकावी तर, प्रेम महाराजाविषयी ती जास्तच वाढवित आहे. लखा-बरें दया म्हणजे ती अमक्यावरच करायची, आणि अमक्यावर नाही असा भेदाभेद मुळीच नाही. एकदां एक गाढव रस्त्यांत मरत पडले होते, ते स्वारिने पाहिले. मग काय गेले जवळ गाढवाच्या, त्याला झोपडी बांधवून, त्याच्या चाया पाण्याची व्यवस्था केली. शेवटी तें मरताना, थोडीशी भागिरथी त्याच्या तोंडांत आणन घातली. आणि त्या गर्दभाने नंतर प्राण सोडले. गाडी हाकलणाराला तरि तसेंच. बैलाला कधी मारूं द्यायचे नाहीत, गाडी सावकाश चालली तरी फिकीर नाही. तुको०-बरें तर. मग आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपली गाडि येथून लवकरच हाकलली पाहिजे. चला. आतांच्या आत्तां कुच करायचा हुकूम या. म्हणजे संध्याकाळी येवले. आपले तंब वगैरे तात्पुरती व्यवस्था, लवकर पुढे जाईल अशी व्यवस्था करा. मीहि त्याच तजविजीला लागतो. सखा०-(आज्ञा, म्हणून जातो. पडदा पडतो.) तिसरा प्रवश समाप्त. प्रवेश ४ था. ( स्थळ. येवले, शाहाणे यांचे घर, सुंदराबाई एकट्याच येतात.) सुंद०-(स्वगत ) तो इंदूरचा राजा आपल्या गांवी परत गेला, त्याला पोचवायला म्हणून, बरोबर जायचं, तर हेगं कायबाई, त्या राजानं आपलं, त्याच गाडीत बसवून आपल्या बरोबर ह्यांनाहि घेऊन गेला. अगोदर कांही बेत नाही काही नाही. तरि मला वाटलंच असं होईल म्हणन ! जाताना इतकं म्हणणं झालं होतं कि, राजाचा आग्रह फार आहे आपल्या तिकडं चला म्हणून! पण माझा जाण्याचा विचार नाही. मी त्यानां स्टेशनावर पोचवून येतो. तर बाई त्यांना पण बरोबर घेऊन गेला तो राजा. आणि तुम्ही उद्या निघण्याची तयारी करा, म्हणून काळ आला सांगत. बरें जायचं तर जायचं, बरोबर तयारी हवी का नको तशी बाहेर गावी जाय