पान:देवमामलेदार.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. जांना तिकडे नेले होते. महाराजांची भक्ति लोकांना अतोनात आहे. महाराज आले इतकी वार्ता कळली पुरे, सगळा गांवच्या गाँव लोटतो दर्शनाला. येवल्यास या एकदां मोठी गम्मत उडाली. महाराजांचे धाकटे बंधु रामचंद्रदादा, हे काही कामा करतां म्हणून तेथे गेले होते. त्यांच्या व महाराजांच्या चेह-यांत साम्य आहे तुको०-मग? सखा-मग काय ? लोकांत झाला पुकार किं महाराज आले ह्मणून, सगळा गांव लोटला. रामचंद्रदादा सांगत 'मी महाराज नव्हे ' असे होता होतां, बऱ्याच वेळाने जेव्हां लोकांस हे आलेले महाराज नव्हेत, असे कळले, तेव्हां प्रत्येक जण खजिल झाला.. भागि०-(धा० रा०स) काय ग, बाई तरि गम्मत ? ( दोघी हंसतात) तुको०-एकंदरीत अशी मजा झाली होती या येवल्यांत म्हणतां बरें आणखी काय झाले चमत्कार? सखा०-चमत्कार कसले म्हणा-पण पुढे मग दुष्काळ आला. के त्या मुळे त्याच कामांत महाराज गुंतले. मग त्यांच्यापाशी इंदु रास निघण्याची गोष्ट काढण्यास तोंडच नव्हते आम्हांला. अशी भूतदया, खरोखरीच त्रिभुवनांत नसेल. दुष्काळग्रस्तलोकास महाराजांनी स्वतः अन्न द्यावे. बरे दुष्काळी तरि थोडे थोडकेकां ? सगळ्या दुष्काळ्यांना अन्न दिल्यावर, मग आपण जेवायचे, हा महाराजांचा नेम. कधी कधी तर महाराज रात्रीचे बारावाजता अन्नास मिळत. असा दयाशील, दूसरा कोणी मायेचा पुत या जगांत असेल असे मला तर वाटत नाही. तुको०-वापु, तुम्हांला अशा सत्पुरुषाचा, आज पांच वर्षे सहवास तरि घडला. मी तुम्हांला पुण्यवान प्राणी समजतो. सखा-दयेचा तो केवळ मूर्तीमंत पुतळा आहे, उन्हाळ्यांत एक दिवस रस्त्याने जात होते, इतक्यांत एक फकिर आला, आणि म्हणाला, 'महाराज विना जते पाव जल रहे है। महारांजांनी स्वतःच्या पायांतला नवा जोडा, ताबडतोब त्याला काढून दिला. आणि आपण तसेच पाय भाजत चालले.