पान:देवमामलेदार.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीगजानन प्रसन्न. देव मामलेदार अथवा दातृत्व विलास नाटक. अकला . प्रवेश १ ला. (स्थळ-अंमळनेरांतिल एक रस्ता. दोन गृहस्थ बोलत येतात.) पहिला गृहस्थ-लग्न घरी जसा आनंद वाटतो, तसा या अंमळनेरांत हल्ली जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे महाराजांची येथे बदली झाल्या पासून. दुसरा गृहस्थ-मला तर नेहमी या गांवांत दिवाळीच भासते. पहि०-अहाहा ! काय मजा आहे ! रोज सण आहे या गांवाला ! गोकुळांत श्रीकृष्णाच्या वेळी अशीच मौज असेल नाही? दुस-बरोबर कल्पना केलीत. श्रीकृष्ण कलियुगांत देव मामलेदारांच्या रूपाने अवतरले, असेंच का म्हणाना ! पहि०-ऐका. हा किनरीवाला आपली किनरी किती मधुर वाजवित आहे ! मला वाटते, या मधुर आवाजातून सुद्धा महाराजांचे यश प्रविष्ट झाले आहे. त्या शिवाय इतकी गोड किनरी या किनरीवाल्याला वाजविता येणेंच अशक्य. दुस-खरोखर अशक्य. अहाहा ! या मधुर अवाजाने वेडावून जाऊन, आपल्याला तर बुबा नागा सारखें डुलतच राहवेसे वाटते. पहि०-अहो मग हा गोंधल्याचा पवाडा तुम्हाला कोणत्या