पान:दूध व दुभते.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाहीसे व्हावे म्हणून हे छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. प्रथम या पुस्तकांतील माग सन १९१० मध्ये 'शेतकरी' वर्तमानपत्रांत छापला. उद्वेश एवढाच की, या विषयासंबंधी थोडीतरी चर्चा होऊन हा विषय समाजापुढे यावा. 'दूध व दुभते , या विषयावर मराठी भाषेमध्ये कसलेही पुस्तक नाही, म्हणून हा विषय पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध करावा अशा पुष्कळ मित्रांकडून सूचना आल्या. त्यावरून हे फारच लहान आणि अपूर्ण असें पुस्तक छापण्याची इच्छा झाली. पुढे पुस्तक छापण्याविषयी प्रेमळ भक्तीने मराठी भाषेची सेवा करणारे रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे यांस विनति केली व त्यांनी ही उदार मनाने ती मान्य केली. कामाच्या वगैरे अनेक अडचणींमुळे हे पुस्तक छापण्याचे काम आज तागाईत लांबणीवर पडलें आज ते समाजाला सादर करण्याचा सुयोग आला त्याबद्दल समाधान वाटते. हे पुस्तक वाचून दुधाविषयी काहीतरी जास्त माहिती समाजास मिळून दुधदुभत्याविषयींचा हलगर्जीपणा कमी झाला, किंवा तो कमी करण्याचा प्रयत्न लोकांकडून अगर म्युनिसिपालिट्यांसारख्या संस्थांकडून झाला, तर हे पुस्तक लिहिण्याचें सार्थक झाले असें मी समजेन. जे दोष वाचकांना या पुस्तकांत दिसतील ते त्यांनी अगदी मोकळ्या मनाने मला कळवावेत, अशी त्यांस नम्र विनंति आहे. याच विषयावर सविस्तर शास्त्रीय माहितीचा एक निराळाच ग्रंथ लिहिण्याचा माझा विचार आहे. त्यावेळी ज्या सूचना येतील त्या अमलात आणण्यास बरें पडेल. आपले दोष आपणास केव्हाही कळत नाहीत; ते दाखविण्यास दुसरीच माणसें लागतात व दोष दाखविल्याशिवाय सुधारणा केव्हाही होणार नाही. याकरितां वाचकांनी वरील विनंतीस मान देऊन जे काय दोष आढळतील, ते कळविण्याची मेहेरबानी करावी. हे पुस्तक लिहितांना श्री. बाळाजी विष्णु पटवर्धन D. Ag. सीनीअर ऑग्रि. लेक्चरर, श्री. रघुनाथ विष्णु दामले B. A. व श्री. महादेव गणेश फाटक L. Ag. बॉटनी लेक्चरर्स यांनी अनेक सूचना केल्या, त्यांबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे. पुणे, वैशाख शुद्ध १०, शके १८३५. ) पुस्तककर्ता.